भारताचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दणका दिला होता. BCCI च्या आचारसंहितेत असलेल्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी दिनेश कार्तिकला नोटीस पाठवण्यात आली होती. या प्रकरणी दिनेश कार्तिकने BCCI ची बिनशर्त माफी मागितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिनेश कार्तिकला BCCI चा दणका

कॅरेबीयन प्रिमीयर लीग स्पर्धेत कार्तिक त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघासोबत दिसला होता. सेंट किट्स अँड निव्ह्स पॅट्रीऑट्स संघाविरूद्ध तो त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये तो दिसून आला असे वृत्त एका संकेतस्थळाने प्रसिद्ध केले होते. त्यामुळे त्याला नोटीस पाठवण्यात आली होती आणि याबाबत उत्तर देण्यासाठी आठवड्याभराचा कालावधी देण्यात आला होता.

त्यावर उत्तर देताना कार्तिकने सांगितले की BCCI ची परवानगी न मागता मी CPL स्पर्धेसाठी विंडिजला गेलो, त्याबाबत मी बिनशर्त माफी मागतो. मी केवळ तेथे गेलो होतो. पण मी त्या स्पर्धेत कोणत्याही गोष्टीत सहभागी नव्हतो. तरीही मी घडलेल्या घटनेबाबत माफी मागतो.

दरम्यान, दिनेश कार्तिक हा BCCI शी वार्षिक कालावधीसाठी करारबद्ध आहे. या कराराअंतर्गत मंडळाच्या परवानगीशिवाय कोणत्याही परदेशी क्रिकेट स्पर्धांमध्ये किंवा लीगमध्ये सहभागी होणे हा नियमांचा भंग ठरतो. त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाचे मालकी हक्कदेखील IPL च्या कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या मालकाकडेच आहेत. पण CPL मधील त्या सामन्यात कार्तिक त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाच्या डगआऊटमध्ये बसलेला आढळला. त्यामुळे त्याला नोटीस पाठवण्यात आली होती.