Dinesh Karthik’s Funny Tweets As Snake Enters LPL 2023: श्रीलंका प्रीमियर लीग (एलपीएल) २०२३ चा हंगाम ३० जुलैपासून सुरू झाला. शनिवारी, ३१ जुलै रोजी, या हंगामातील दुसरा सामना गॅले टायटन्स आणि डंबुला ऑरा यांच्यात खेळला जात असताना, मैदानावर अचानक साप दिसल्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्यामुळे सामनाही काही काळ थांबवावा लागला. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसरीकडे, दिनेश कार्तिकनेही ट्विट करून मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामन्यादरम्यान साप घुसल्याबद्दल दिनेश कार्तिकने आपल्या ट्विटमध्ये बांगलादेशचा उल्लेख केला आहे. कार्तिकने लिहिले की, ”नागिन परतली आहे, मला वाटले की मी बांगलादेशमध्ये आहे.” या ट्विटमध्ये कार्तिकने हॅशटॅगसोबत नागिन डान्सही लिहिले आहे. बांगलादेश संघाने निदाहास ट्रॉफीमध्ये ज्या प्रकारे सेलिब्रेशन केले होते, ते त्याला आठवल्याचे स्पष्टपणे समजू शकते.

बांगलादेश क्रिकेट संघाचा नागिन डान्स खूप प्रसिद्ध आहे, ज्यासाठी ते अनेक सामन्यांमध्ये इतर संघांच्या खेळाडूंशी भिडले आहेत. कारण त्यांच्या या पद्धतीने सेलिब्रेशन केले आहे. श्रीलंकेत जेव्हा निदाहास ट्रॉफी खेळली गेली होती, तेव्हा बांगलादेश संघाच्या नागिन डान्सची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.

हेही वाचा – Team India: “खेळाडूंना अहंकार नाही पण माजी खेळाडूंना”, रवींद्र जडेजाचे कपिल देव यांना प्रत्युत्तर

शाकिब अल हसनने साप दिसल्याने अंपायरला इशारा केला –

गॅले टायटन्स आणि डंबुला ऑरा यांच्यातील सामन्याच्या दुसऱ्या डावात, जेव्हा मैदानावर साप दिसला तेव्हा बांगलादेशचा अनुभवी खेळाडू शकीब अल हसन याने प्रथम अंपायरला इशारा केला. यानंतर काही काळ सामना थांबवण्यात आला. त्यानंतर जेव्हा साप सीमारेषेच्या बाहेर गेला, तेव्हा पुन्हा सामना सुरू झाला. ही घटना पावरप्लेचे पाचवे षटक सुरु होण्यापूर्वी घडली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dinesh karthiks funny tweets as snake enters lpl 2023 match vbm