अस्ताना : ग्रँडमास्टर डिंग लिरेनने ऐतिहासिक कामगिरी करताना चीनचा पहिला जगज्जेता बुद्धिबळपटू म्हणून मिरवण्याचा मान मिळवला. लिरेनने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीच्या रविवारी झालेल्या ‘टायब्रेकर’मधील चौथ्या व अखेरच्या डावात रशियाचा ग्रँडमास्टर इयान नेपोम्नियाशीवर मात केली. त्यामुळे नेपोम्नियाशीला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर लिरेन १७वा जगज्जेता ठरला.

लिरेनच्या विजयामुळे बुद्धिबळविश्वाला २०१३ नंतर प्रथमच नवा जगज्जेता मिळाला आहे. विश्वातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू म्हणून नावलौकिक मिळवलेल्या मॅग्नस कार्लसनने यंदाच्या जागतिक लढतीतून माघार घेतली होती. त्यामुळे लिरेन व नेपोम्नियाशी यांना जगज्जेतेपदासाठी लढण्याची संधी मिळाली आणि त्यांनी विजय मिळवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले.

Sabalenka Zverev progress
सबालेन्का, झ्वेरेवची विजयी सलामी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Border-Gavaskar Trophy India defeat against Australia sport news
‘डब्ल्यूटीसी’तील आव्हानही संपुष्टात
IND v AUS Australia wins BGT 2025 after 10 years against India
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने १० वर्षांनी भारताला नमवत जिंकली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, WTC फायनलमध्ये मारली धडक
Sachin Tendulkar Praised Rishabh Pant Fiery Inning in Sydney Test Said He has rattled Australia from ball one
IND vs AUS: सचिन तेंडुलकरही ऋषभ पंतची वादळी खेळी पाहून भारावला, कसोटीत टी-२० स्टाईल पाहून म्हणाला; “त्याने ऑस्ट्रेलियाला…”
Magnus Carlsen match fixing
विश्लेषण : जागतिक अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपदासाठी कार्लसनकडून ‘फिक्सिंग’? नक्की प्रकरण काय?
Image Of Manu Bhaker
Khel Ratna Award 2024 : मनू भाकेर, डी गुकेशसह चार खेळाडूंना खेलरत्न, १७ जानेवारीला होणार पुरस्काराचे वितरण
Arjun Erigaisi latest marathi news
गुकेशच्याही वरचे रँकिंग… जगात पहिल्या पाचात.. तरीही जगज्जेतेपदासाठी अर्जुन एरिगेसी गुकेशसमोर आव्हानवीर का ठरणार नाही?

लिरेन आणि नेपोम्नियाशी यांच्यात १४ डावांअंती ७-७ अशी बरोबरी होती. त्यामुळे जागतिक अजिंक्यपद लढतीचा विजेता ठरवण्यासाठी ‘टायब्रेकर’चा अवलंब करण्यात आला. रविवारी झालेल्या जलद (रॅपिड) ‘टायब्रेकर’मधील पहिले तीन डाव बरोबरीत सुटले. मात्र, चौथ्या डावात लिरेनला सर्वोत्तम खेळ करण्यात यश आले.

चौथ्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या नेपोम्नियाशीने ‘रुइ लोपेझ’ पद्धतीने सुरुवात केली. लिरेनने ११व्या चालीत आपला मोहरा ‘ए४’वर नेला आणि अदलाबदलीला सुरुवात केली. पटावरील स्थिती पाहता हा डावही बरोबरीत सुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, लिरेनने ९० सेकंदांपेक्षाही कमी वेळ शिल्लक असतानाही आक्रमक चाली रचल्या आणि नेपोम्नियाशीवर दडपण आणले. अखेर नेपोम्नियाशीचा खेळ खालावला व लिरेनने जेतेपद मिळवले.

मी जिंकलो, तो क्षण माझ्यासाठी खूप भावनिक होता. मला अश्रू अनावर होतील हे ठाऊक होते आणि तसेच झाले. मी जगज्जेतेपद मिळवेन असा स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. जगज्जेतेपद माझ्यासाठी फार महत्त्वाचे नाही. विश्वातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू म्हणून ओळखला जाणे हे माझे ध्येय होते आणि ते गाठण्याच्या मी जवळ आहे. 

िंग लिरेन

मला विजेतेपद मिळवण्याची पूर्ण संधी होती. पारंपरिक पद्धतीच्या डावात (१४ डाव) मी अधिक चांगला खेळ करुन एक अतिरिक्त सामना जिंकला पाहिजे होता. केवळ एक किंवा दोन चालींचा प्रश्न होता. मात्र, त्यात मी कमी पडलो. ‘टायब्रेकर’मध्ये नशिबाची साथही महत्त्वाची असते.  – इयान नेपोम्नियाशी   

Story img Loader