तब्बल दोन वर्ष दुखापतीमुळे मैदानापासून बाहेर राहिलेल्या जिमनॅस्ट दिपा कर्माकरने धडाक्यात सुरुवात केली आहे. तुर्कीच्या मेरसिन शहरात सुरु असलेल्या आर्टिस्टीक जिमनॅस्टीक विश्वचषकात दिपाने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. २४ वर्षीय दिपा कर्माकरचं रिओ ऑलिम्पीकमध्ये अवघ्या काही गुणांच्या फरकाने सुवर्णपदक हुकलं होतं. त्यानंतर दिपा दुखापतीमुळे काहीकाळ जिमनॅस्ट फिल्डच्या बाहेर होती, मात्र महत्वाच्या स्पर्धेआधी दिपाने जोरदार तयारी करत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. दिपाचं विश्वचषकातलं हे पहिलं विजेतेपद ठरलं आहे.
पात्रता फेरीत दिपा कर्माकरने ११.८५० गुणांची कमाई केली होती. यानंतर अंतिम फेरीतही आपला फॉर्म कायम राखत दिपाने भारतीय चाहत्यांना निराश होऊ दिलं नाही. आगामी आशियाई खेळांसाठी भारताच्या जिमनॅस्ट चमूमध्येही दिपा कर्माकरची निवड करण्यात आलेली आहे.
आणखी वाचा