भारताची अव्वल जिम्नॅस्ट दीपा कर्मकार जर्मनीतील कॉटबस येथे होणाऱ्या लयबद्ध (आर्टिस्टिक) जिम्नॅस्टिक्सच्या विश्वचषकात खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. दुखापतींचा विचार मनातून दूर ठेवत पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळवण्याच्या निर्धाराने दीपा गुरुवारपासून तिचे कौशल्य पणाला लावणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतून खेळाडूंच्या सादरीकरणातील सर्वोत्तम तीन प्रकारांतील गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. भारताकडून चार सदस्यांचे पथक या स्पर्धेसाठी रवाना झाले आहे. त्यात बी. अरुणा रेड्डी, आशीष कुमार, राकेश पात्रा आणि दीपा यांचा समावेश आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथा क्रमांक पटकावत दीपाने भारतीय क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता.