महिलांच्या एकेरीतील कार्यक्रमपत्रिका नियमावलीनुसार तयार करण्यात आलेली नसली तरी मी देशासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणार आहे, असे भारताची अव्वल दर्जाची स्क्वॉशपटू दीपिका पल्लिकल हिने सांगितले. आगामी आशियाई स्पर्धेत भारताच्या दीपिका व जोत्स्ना चिनप्पा या दोन्ही खेळाडूंना एकाच विभागामध्ये टाकण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची उपांत्यपूर्व फेरीत गाठ पडण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमपत्रिकेबाबत नाराजी व्यक्त करीत दीपिका सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात येत होते, मात्र त्यामध्ये कोणतेही तथ्य नसून मी आशियाई स्पर्धेत भाग घेणार आहे. मी माझ्या सरावावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. या स्पर्धेतील वैयक्तिक व सांघिक या दोन्ही विभागांत पदक मिळविण्यासाठीच मी खेळणार आहे, असे दीपिकाने सांगितले.

Story img Loader