भारताच्या दीपिका पल्लिकलने इजिप्तच्या सलमा हनी इब्राहिमवर दणदणीत विजय मिळवीत ग्रेनाइट खुल्या स्क्वॉश अजिंक्यपद स्पध्रेची उपांत्य फेरी गाठली. गतवर्षी उपविजेतेपदावर समाधान मानणाऱ्या जागतिक क्रमवारीत १७ व्या स्थानावर असलेल्या दीपिकाने सलमाचा
१२-१०, ११-२, ११-४ असा पराभव केला.
‘‘मागील लढतीपेक्षा सलमाने मला अधिक चांगली लढत दिली. पहिला गेम रंगतदार झाला. ७-१० अशा पिछाडीनंतरही मी तू जिंकून दाखवला. त्यामुळे आत्मविश्वास अधिक दुणावल्याने पुढील दोन गेममध्ये मला वर्चस्व राखता आले. सलमा ही बुद्धिमान खेळाडू असल्याने या विजयामुळे मला अतिशय आनंद झाला,’’ असे दीपिकाने सामन्यानंतर सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा