भारताची अव्वल स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलने टेक्सास खुल्या स्क्वॉश स्पर्धेत संघर्षपूर्ण विजयासह उपांत्य फेरी गाठली आहे. दीपिकाने गयानाच्या निकोलेट फर्नाडिसवर ११-४, ११-६, १०-१२, १०-१२, ११-५ असा विजय मिळवला. पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणारी आणि प्रशिक्षक सारा फिट्सगेराल्डच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या दीपिकाला बिगरमानांकित निकोलेटने चांगलचे झुंजवले. पहिले दोन गेम जिंकत दीपिकाने दमदार आगेकूच केली होती, मात्र त्यानंतर निकोलेटने सर्वच फटक्यांचा प्रभावी उपयोगी करत पुढचे दोन गेम जिंकत बरोबरी केली. निर्णायक विजयाच्या उंबरठय़ावर असणाऱ्या निकोलेटचे स्वप्न दीपिकाने पूर्ण होऊ दिले नाही. सगळा अनुभव पणाला लावत दीपिकाने हिरिरीने खेळ करत पाचवा गेम नावावर करत सामना जिंकला. चेन्नईच्या दीपिकाची उपांत्य फेरीत आठव्या मानांकित आणि आर्यलडच्या मॅडेलिन पेरीशी लढत होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dipika pallikal reaches texas open semi finals