पीटीआय, नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाच्या हंगामी समितीने आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या संघ निवडीचे निकष स्पष्ट करताना बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांना थेट भारतीय संघात प्रवेश देण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला. हंगामी समितीने सध्या सुरू असलेल्या कुस्ती संघटनेच्या वादावर पडदा टाकण्याचा केलेला हा एक प्रयत्न मानला जात असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हंगामी समितीने राष्ट्रीय संघासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मुख्य प्रशिक्षकांचा सल्ला विचारात न घेता हा निर्णय घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हंगामी समितीने एक पत्रक काढून निवड चाचणी फ्री-स्टाईल, ग्रिको रोमन आणि महिला अशा तीनही विभागांतील सर्व सहा वजनगटात होतील. मात्र, पुरुषांच्या ६५ किलो आणि महिलांच्या ५३ किलो वजन गटासाठी मल्ल निश्चित असल्याचे जाहीर केले.
हंगामी समितीने बजरंग आणि विनेश यांच्या नावाचा उल्लेख केला नसला, तरी समितीमधील एक सदस्य अशोक गर्ग यांनी या दोघांनाही निवड चाचणीतून वगळण्यात आल्याचे स्पष्ट केले. निवड चाचणीला चारच दिवस बाकी असताना भारतीय ऑलिम्पिक संघटनेने नियुक्त केलेल्या हंगामी समितीच्या या निर्णयाने सगळेच चकित झाले आहे. बजरंग आणि विनेश सध्या परदेशात प्रशिक्षण घेत असले तरी, गेल्याच आठवडय़ात झालेल्या आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धेतून दोघांनी ऐनवेळी माघार घेतली होती. ग्रिको रोमन आणि महिलांची निवड चाचणी २२ जुलै आणि पुरुषांच्या फ्री-स्टाईल गटाची चाचणी २३ जुलै रोजी होणार आहे.
भारतीय कुस्ती महासंघाविरुद्धच्या आंदोलनात सहभागी झालेल्या संगीता फोगट, साक्षी मलिक, सत्यव्रत कादियन आणि किन्हा हे चार अन्य मल्ल निवड चाचणीत सहभागी होणार का हे देखील अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही. किन्हा किर्गीझस्तानमध्ये बजरंगचा सरावातील साथीदार म्हणून गेला आहे. हंगामी समितीचे प्रमुख भुपेंदर बाजवा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. मात्र, निवड समितीच्या निकषासंदर्भात कुणाला आक्षेप असेल, तर त्यांनी हंगामी समितीशी संपर्क साधावा असे पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीचा मार्ग गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे मोकळा झाला आहे. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि एस.व्ही. भाटी यांच्या खंडपीठाने तातडीने निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे आदेशही दिले आहेत. आसाम कुस्ती संघटनेने मतदानाचा अधिकार रोखल्यामुळे गुवाहाटी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी पूर्ण होईपर्यंत कुस्ती महासंघाच्या निवडणुकीस स्थगिती आणण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. या याचिकेवरील सुनावणी २८ जुलैला होणार होती. मात्र, याविरुद्ध आंध्र प्रदेश कुस्ती संघटनेने एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर त्यावर प्रतिबंध लादता कामा नये आणि प्रतिस्पर्धी किंवा मतदारांच्या तक्रारीनंतर निवडणूक याचिकेद्वारे निकालात आणल्या जाऊ शकतात, असे आंध्र प्रदेश कुस्ती संघटनेने दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हणण्यात आले आहे. आसाम संघटना जवळपास दहा वर्षांहून अधिक वर्षे कुस्तीत सक्रिय नाही. यापूर्वी दोन वेळा निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. त्या वेळेसही आसाम संघटना पुढे आली नाही. त्यामुळेच आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला, असे आंध्र कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आर. के. पुरुषोत्तम यांनी सांगितले.
बजरंग, विनेशला निवड चाचणीतून सूट देण्याचा निर्णय आम्हाला न विचारता घेण्यात आला आहे. हंगामी समितीने आम्हाला कधीही बैठकीसाठी बोलावले नाही. या दोघांना सूट देण्याची कुठलीही सूचना आमच्याकडून करण्यात आलेली नाही. – जगमंदर सिंग, फ्री-स्टाइल पुरुष संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक
बजरंग, विनेशची काय तयारी आहे माहीत नाही. गेले आठ महिन्यांत त्यांनी एकाही स्पर्धेत सहभाग घेतलेला नाही. त्यामुळे त्यांची प्रगती काय आहे याची आम्हाला कल्पनाच नाही. – वीरेंद्र दहिया, महिला प्रशिक्षक