क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन, महेंद्र सिंग, मिताली राज, कपिल देव आणि प्रवीण तांबे यांच्यानंतर आता आणखी एका क्रिकेटरचा बायोपिक लवकरच पडद्यावर पाहायला मिळणार आहे. लाला अमरनाथ असे या महान खेळाडूचे नाव आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी लाला अमरनाथ यांच्यावर बायोपिक बनवणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा चित्रपट बनवण्याची त्याची खूप दिवसांपासून इच्छा होती, पण शाहरुख खानने डंकीची निवड केल्यामुळे त्याला विलंब झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे, ज्याची निर्मिती फरहान अख्तरची कंपनी एक्सेल एंटरटेनमेंट करणार आहे. राजकुमार हिरानी यांनी संजू, 3 इडियट्स, पीके, मुन्नाभाई एमबीबीएस सारखे हिट चित्रपट केले आहेत.

लाला अमरनाथ यांचा बायोपिक २०१९ बनणार होता –

प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी लाल अमरनाथच्या बायोपिकची तयारी करत आहेत, त्यांनी ४ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ चित्रपटाची योजना आखली होती. परंतु काही कारणांमुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला, मात्र आता त्यावर काम सुरू झाले आहे.

कोण आहेत लाला अमरनाथ?

लाला अमरनाथ यांचा जन्म ११ सप्टेंबर १९११ रोजी पंजाबमधील कपूरथला येथे झाला. लाला अमरनाथ यांचे नाव नानिक अमरनाथ भारद्वाज आहे. ते उत्तर प्रदेश, दक्षिण पंजाब, रेल्वे, गुजरात इत्यादी संघांसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळले आहेत. १५ डिसेंबर १९३३ रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी १२ डिसेंबर १९५२ रोजी शेवटचा कसोटी सामना खेळला. लाला अमरनाथ यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी (५ ऑगस्ट २०००) निधन झाले.

लाला अमरनाथ यांची क्रिकेट कारकीर्द –

१९३३ ते १९५२ या काळात लाला अमरनाथ यांनी २४ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले. यामध्ये त्यांनी ८७८ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लाला अमरनाथ यांनी ४ अर्धशतके आणि १ शतक झळकावले. त्यांनी ४५ आंतरराष्ट्रीय विकेटही घेतल्या आहेत. याशिवाय लाला अमरनाथ यांनी १८६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १०४२६ धावा केल्या आणि ४६३ विकेट घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director rajkumar hirani will make a biopic on former cricketer lala amarnath vbm