स्टुअर्ट ब्रॉडने घेतलेल्या सहा विकेट्सच्या जोरावर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा पहिला डाव २५४ धावांतच आटोपला. २११ धावांनी पिछाडीवर असणाऱ्या न्यूझीलंडला इंग्लंडने फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडची १ बाद ७७ अशी स्थिती असून, ते अजूनही १३४ धावांनी पिछाडीवर आहेत.
३ बाद ६६ वरून पुढे खेळणाऱ्या न्यूझीलंडची स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक माऱ्यासमोर भंबेरी उडाली. ब्रेंडान मॅक्युल्लमने ६९, तर ब्रॅडले वॉटलिंगने ६० धावा केल्या. मात्र न्यूझीलंडचा डाव २५४ धावांतच आटोपला. इंग्लंडने फॉलोऑन दिल्यानंतर न्यूझीलंडची दुसऱ्या डावातही सुरुवात खराब झाली.
न्यूझीलंडवर फॉलोऑनची नामुष्की
स्टुअर्ट ब्रॉडने घेतलेल्या सहा विकेट्सच्या जोरावर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा पहिला डाव २५४ धावांतच आटोपला.
First published on: 17-03-2013 at 03:02 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disgrace of followon on newzealand