Pakistan vs Bangladesh World Cup 2023 Match: विश्वचषकात सलग चार पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाला जगभरातून टीकेला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे बाबरचा संघ या विश्वचषकातून बाहेर पडला आहे दुसरीकडे, एवढ्या पराभवानंतरही संघाचे नाटक कमी होत नसल्याचे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू सांगत आहेत. बांगलादेशचा सामना करण्यासाठी कोलकाता येथे पोहोचलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाने हॉटेलच्या मेनूमध्ये बिर्याणी नसल्यामुळे जेवण करण्यास नकार दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासह चार सामने पराभूत झालेला पाकिस्तानचा संघ आणि खेळाडूंमध्ये जोरदार वाद होत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफ हे पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम यांच्याशी बोलत नसून त्यांचे फोनही उचलत नसल्याच्या बातम्या येत आहेत. दरम्यान, पाकिस्तानचा संघ कोलकाता येथे पोहोचला असून मंगळवारी त्याला बांगलादेशविरुद्ध सामना खेळायचा आहे.

कोलकातामधील फूड डिलिव्हरी अ‍ॅपवरून जेवण मागवले

पाकिस्तानचा संघ आत्तापर्यंत जिथे जिथे खेळायला गेला आहे तिथे त्या शहरातील प्रसिद्ध हॉटेल्समध्ये जेवणाचा आनंद लुटला आहे. मात्र, कोलकात्यातमध्ये पाकिस्तानचा संघ बाहेर जेवायला गेला नाही, त्यांनी फूड डिलिव्हरी अ‍ॅपवरून जेवण मागवले. त्यांनी हॉटेलमध्ये सर्वांबरोबर जेवण करण्यास नकार दिला आणि कोलकात्यातील प्रसिद्ध रेस्टॉरंटमधून बिर्याणी, कबाब आणि चप ऑर्डर केली आणि ती खाल्ली.

हेही वाचा: Lionel Messi: लिओनेल मेस्सीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! आठव्यांदा बॅलन डी’ओर पुरस्काराने सन्मानित

हॉटेल संचालकांनी दिली सविस्तर माहिती

रेस्टॉरंटच्या त्या संचालकाने सांगितले की, “सुरुवातीला त्यांना हे माहित नव्हते की ही ऑर्डर पाकिस्तान क्रिकेट संघाची आहे, परंतु नंतर त्यांना ते कळले.” ते पुढे म्हणाले की, “कोलकात्याची बिर्याणीमध्ये स्वतःची एक वेगळी शैली आहे, जी जगभरात प्रसिद्ध आहे.” संचालक म्हणाले, “ही ऑर्डर ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मद्वारे आली होती. त्यात त्यांनी बिर्याणी, कबाब आणि चाप अशा तीन पदार्थांची ऑर्डर दिली. रविवारी सायंकाळी सातनंतर त्यांनी ही ऑर्डर दिली होती. मला आशा आहे की त्यांना जेवण आवडले असेल.”

वसीम अक्रम याने केली पाकिस्तान संघावर टीका

पाकिस्तानी संघाने भलेही कोलकात्याच्या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला असेल, पण त्यांच्या खाण्याच्या सवयींवर माजी कर्णधार वसीम अक्रम याने सडकून टीका केली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर संघ मैदानावर सुस्त असल्याची टीका अक्रमने केली होती. पाकिस्तानी स्पोर्ट्स चॅनलवरील सामन्यानंतर अक्रम म्हणाला की, “मला वाटते की हे जणू काही संघ रोज आठ किलो मांस खात आहे. इतक मासांहार करणे विश्वचषकादरम्यान संघासाठी खूप हानीकारक आहे. यामुळे तुम्ही खूप सुस्त होतात पण तुमच्या तंदुरुस्तीवर देखील मोठा परिणाम होतो.”

हेही वाचा: Pakistan Cricket: पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवं वादळ! विश्वचषकातील खराब कामगिरी अन् इंझमाम-उल-हकने दिला तडकाफडकी राजीनामा

पाकिस्तानचा पुढचा सामना बांगलादेशशी

पाकिस्तान संघ विश्वचषक स्पर्धेतून जवळपास बाहेर पडला असून चार पराभव आणि दोन विजयांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. कोलकातामध्ये त्यांचा सामना गुणतालिकेत नवव्या स्थानावर असलेल्या बांगलादेशशी होत आहे. यानंतर संघाचा सामना ४ नोव्हेंबरला बंगळुरूमध्ये न्यूझीलंड आणि ११ नोव्हेंबरला कोलकात्यात इंग्लंडशी होणार आहे.