पंकज बामणे (क्रीडा प्रबोधिनी) व जुई जांभुळकर (दुबे अकादमी) यांनी बापूसाहेब झंवर स्मृती जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटात सवरेत्कृष्ट वेटलिफ्टरचा मान मिळविला.
सर परशुरामभाऊ महाविद्यालयात झालेल्या या स्पर्धेत शंभरहून अधिक खेळाडूंनी भाग घेतला. पुरुष गटात क्रीडा प्रबोधिनी संघाने सांघिक विजेतेपद मिळविले, तर महिलांमध्ये हा मान काळे अकादमीस मिळाला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ज्येष्ठ वेटलिफ्टिंग प्रशिक्षक व सूर्या जिमचे संचालक अरुण दातार यांच्या हस्ते झाला. या वेळी सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप शेठ, डॉ.मधुसूदन झंवर, प्रमोद चोळकर, अशोक झंवर हेही उपस्थित होते.
गटवार निकाल
पुरुष-५० किलो-१.मंदार गाते, २.अतुल साळुंखे, ३.रोहित चव्हाण. ५६ किलो-१.मनीष गजमल, २.संदीप कारमारे, ३.ह्रषीकेश चव्हाण. ६२ किलो-१.पंकज बामणे, २.मनोज म्हसाळकर, ३.अक्षय म्हसाळकर. ६९ किलो-१.मलिक शेख, २.अर्पित साळवी, ३.संतोष लोंढे. ७७ किलो-१.ऋषी दुबे, २.राजू अस्वले, ३.विष्णु तुपे. ८५ किलो-१.ओंकार आडके, २.राजू नायके, ३.वैभव हालके. ९४ किलो-१.परशुराम पठारे, २.जैनुद्दिन शेख, ३.अक्षय कदम. १०५ किलोखालील-१.शुभम लोंढे, २.प्रतीक जाधव, ३.विकास जामदार. १०५ किलोवरील-१.गणेश जगताप.
महिला-४८ किलो-१.चेतना घोजगे, २.अमृता पवार, ३.सुप्रिया हजारे. ५३ किलो-१.शमी मुळे, २.रुपाली ढाकोळ, ३.तस्लीम शेख. ५८ किलो-१.जुई जांभुळकर, २.प्राजक्ता कुदळे. ६३ किलो-१.स्नेहल सावंत, २.शरयू काळे, ३.दुर्गा यादव. ६९ किलो-१.कीर्ति भोसले, २.स्वप्नाली बेनकर. ७५ किलो-१.पूजा नायर, २.रिदिमा व्होरा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा