टेनिस जगतातील अव्वल स्थानावरील नोव्हाक जोकोव्हिचशी भारताच्या सोमदेव देववर्मनला तोलामोलाची टक्कर देता आली नाही. त्यामुळेच एटीपी मियामी मास्टर्स टेनिस स्पध्रेतील सोमदेवचे आव्हान संपुष्टात आले. अव्वल मानांकित आणि गतविजेत्या जोकोव्हिचने सव्‍‌र्हिसचे ३१पैकी २८ गुण घेतले आणि तिसऱ्या फेरीतील सामना ६-२, ६-४ असा असा आरामाता खिशात घातला. हा सामना एक तास आठ मिनिटे चालला.

Story img Loader