Australian Open 2025 QF : ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील आपली चमकदार कामगिरी नोव्हाक जोकोविचने कायम ठेवली आहे. मंगळवारी झालेल्या रोमहर्षक क्वार्टर फायनलमध्ये नोव्हाक जोकोव्हिचने त्याचा पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्काराझचा पराभव केला आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात ( Australian Open 2025 QF ) जोकोव्हिचने कार्लोसला 4-6, 6-4, 6-3, 6-4 अशा सेटमध्ये हरवलं. पहिल्या सेटमध्ये जोकोविचला कार्लोसने हरवलं होतं. पण त्यानंतर जोकोव्हिचने दमदार पुनरागमन करत सलग तीन सेट जिंकले आणि उपांत्य फेरीत धडक मारली.

साडेतीन तास चालला सामना

जोकोविच आणि अल्काराझ यांच्यातला हा सामना ( Australian Open 2025 QF ) सुमारे साडेतीन तास चालला. अत्यंत कठीण वाटणाऱ्या या सामन्यावर जोकोव्हिचने आपलं नाव कोरलं. दुखापतीमुळे जोकोव्हिच या सामन्यातून माघार घेणार की काय अशी साशंकता होती. मात्र चिवट खेळाचा प्रत्यय घडवत जोकोव्हिचने संस्मरणीय विजयाची नोंद केली. नोव्हाक जोकोव्हिचची या स्पर्धेतली ही पन्नासावी क्वार्टर फायनल मॅच होती. आता उपांत्य फेरीत त्याचा सामना जर्मनीच्या आलेक्झांडर झरेव्हशी होणार आहे.

novak djokovic breaks roger federer record
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविचचे ऐतिहासिक यश ; फेडररला मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामन्यांत सहभाग
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Pooja Sawant First Makar Sankranti Celebration
Video: पूजा सावंतने पतीबरोबर ऑस्ट्रेलियात साजरी केली पहिली मकर संक्रात; सासूबाई कमेंट करत म्हणाल्या…
Dr Kartik Karkera from Mumbai
मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा नाशिक मविप्र मॅरेथॉन -२०२५ चा विजेता, पहिले तीनही धावपटू महाराष्ट्रातील
Vaikuntha Ekadashi Vrat
Vaikuntha Ekadashi 2025: गूगलवर ट्रेंड होतेय २०२५ मधील पहिली एकादशी; जाणून घ्या एकादशीचा शुभ मुहूर्त आणि तिथी
Makar Sankranti 2025 Puja Time and Significance in Marathi
Makar Sankranti 2025: १४ जानेवारी रोजी साजरी केली जाणार मकर संक्रांत; जाणून घ्या संक्रांतीचा पुण्य काळ, तिथी आणि महत्त्व
Yuvraj Singh expresses his feelings on India defeat against New Zealand sports news
न्यूझीलंडविरुद्धचा पराभव सर्वात निराशाजनक; माजी अष्टपैलू युवराज सिंगची भावना
India Slip To Third Position in ICC test Team Rankings After Defeat in Australia Test and South Africa Whitewashed Pakistan
ICC Test Team Rankings: भारताला पाकिस्तानच्या पराभवाचा कसोटी क्रमवारीत धक्का, ऑस्ट्रेलियानंतर आफ्रिकेमुळे टीम इंडिया ‘या’ स्थानावर घसरली

१२ व्यांदा सेमी फायनलमध्ये पोहचला जोकोविच

१२ व्यांदा सेमी फायनल स्पर्धेत जोकोव्हिचने धडक मारली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत ( Australian Open 2025 QF ) ९९ व्या विजयावर त्याने आपलं नाव कोरलं आहे. तसंच २५ व्या ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल केली. जोकोव्हिच सामना जिंकल्यावर म्हणाला, “आजचा सामना जर अंतिम सामना असता तर किती बरं झालं असतं. या कोर्टवर मी खेळलेल्या आणि इतर कुठल्याही ठिकाणी खेळलेल्या मोठ्या सामन्यांप्रमाणेच आजचा हा टेनिसचा सामना होता”, असंही त्याने म्हटलं आहे.

जोकोव्हिचचा दबदबा कायम

जोकोव्हिच आणि जर्मनीचा खेळाडू अलेक्झांडर झरेव्ह या दोघांचा सामना २४ जानेवारी रोजी होणार आहे. टेनिस विश्वातही आजची क्वार्टर फायनल जिंकून नोव्हाक जोकोव्हिचने त्याचा दबदबा कायम ठेवला आहे. जोकोव्हिचला ऑस्ट्रेलियन ओपनचा बादशहा मानलं जातं. त्याने पुरुष एकेरी स्पर्धेत १० वेळा ऑस्ट्रेलियन ओपनचं जेतेपद पटकावलं आहे. त्याच्यानंतर नाव येतं ते सेरेना विल्यम्सचं. सेरेना सातवेळा जेतेपदाची मानकरी ठरली आहे. अल्काराझविरोधातला जोकोव्हिचचा आजचा सामना खडतर होता. मात्र त्याने संघर्षमय विजय मिळवत सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.

Story img Loader