जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने शानदार फॉर्म कायम राखत माँटे कालरे खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. जोकोव्हिचने चेक प्रजासत्ताकच्या टॉमस बर्डीचवर ७-५, ४-६, ६-३ असा विजय मिळवला. इंडियन वेल्स, मियामी आणि आता माँटे कालरे अशी तीन मास्टर्स दर्जाच्या स्पर्धा लागोपाठ जिंकणारा जोकोव्हिच पहिला खेळाडू ठरला आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत जोकोव्हिचने राफेल नदालवर सनसनाटी विजय मिळवला होता. या विजयासह जोकोव्हिचने बर्डीचविरुद्धची कामगिरी १९-२ अशी सुधारली.

Story img Loader