पाठीच्या दुखण्यामुळे रॉजर फेडरनने माघार घेतल्यामुळे एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेचा विजेता म्हणून नोव्हाक जोकोव्हिचला घोषित करण्यात आले. प्रत्येक फेरीत अव्वल खेळाडूंचे आव्हान परतावून लावत जोकोव्हिच आणि फेडरर अंतिम फेरीत दाखल झाले होते. मात्र फेडररच्या माघारीमुळे हा सामना रद्द करण्यात आला आणि जोकोव्हिच अजिंक्य ठरला. या स्पर्धेचे जोकोव्हिचचे हे सलग तिसरे जेतेपद आहे. आता मी कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. शारीरिकदृष्टय़ा मला तंदुरुस्त वाटते आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अव्वल दर्जाचे टेनिस खेळण्यासाठी मी सज्ज आहे. या फॉर्मचा उपयोग जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान टिकवण्यासाठी आणि अधिकाअधिक जेतेपदे पटकावण्यासाठी करेन असे जोकोव्हिचने सांगितले. गेल्या चार वर्षांत जोकोव्हिचने तिसऱ्यांदा वर्षांचा शेवट जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानासह केला. विम्बल्डन जेतेपदासह जोकोव्हिचने यंदाच्या वर्षांत मियामी, इंडियन वेल्स, रोम, पॅरिस स्पर्धाचे जेतेपद नावावर केले.
दरम्यान पाठीच्या दुखापतीमुळे रॉजर फेडरर याचा डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीमधील सहभाग अनिश्चित आहे, असे सर्बियाचा खेळाडू नोवाक जोकोवीच याने येथे सांगितले. शुक्रवारी डेव्हिस चषकाच्या अंतिम लढतीत स्वित्र्झलडला फ्रान्सशी खेळावे लागणार आहे. फेडरर हा तोपर्यंत तंदुरुस्त होणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
जोकोव्हिच अजिंक्य
पाठीच्या दुखण्यामुळे रॉजर फेडरनने माघार घेतल्यामुळे एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेचा विजेता म्हणून नोव्हाक जोकोव्हिचला घोषित करण्यात आले. प्रत्येक फेरीत अव्वल खेळाडूंचे आव्हान परतावून लावत जोकोव्हिच आणि फेडरर अंतिम फेरीत दाखल झाले होते.
First published on: 18-11-2014 at 03:02 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Djokovic wins world tour finals after federer pulls out