क्रिकेटमधील डकवर्थ लुईस पद्धतीचे निर्माते आणि इंग्रजी सांख्यिकीशास्त्रज्ञ फ्रँक डकवर्थ यांचे निधन झाले. डकवर्थ यांनी २१ जून वयाच्या ८४व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. डकवर्थ-लुईस पद्धत डकवर्थ आणि त्यांचे सहकारी सांख्यिकीशास्त्रज्ञ टोनी लुईस यांनी तयार केली होती आणि ती पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या सामन्यांच्या निकालाचा अंदाज लावण्यासाठी वापरली जाते. डकवर्थ यांचे साथीदार लुईस यांचं २०२० मध्ये वयाच्या ७८ वर्षी निधन झालं.

डकवर्थ लुईस हा नियम पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यांमध्ये किंवा हवामानामुळे खेळात व्यत्यय आल्यावर सामना थांबवल्याने क्रिकेटमध्ये हा नियम वापरला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा नियम पहिल्यांदा १९९७ मध्ये वापरण्यात आला. डीएलएसचा वापर नुकताच चालू असलेल्या टी-२० विश्वचषकातील अफगाणिस्तान-बांगलादेश सामन्यातही करण्यात आला. मंगळवारी झालेल्या सुपर८ फेरीतील सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशला पावसाने प्रभावित सामन्यात पराभूत करून इतिहास घडवत पहिल्यांदाच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Mohammad Nabi part of wins against 45 nations For Afganistan
अफगाणिस्तानची प्रगती ‘याचि देही याचि डोळा’ पाहणारा मोहम्मद नबी, जागतिक क्रिकेटमधील अनोखा विक्रमवीर
Manoj Jarange Warning to Devendra Fadnavis
लोकसभेच्या निकालानंतर मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा, “..तर विधानसभेला इंगा”
PM narendra modi and joe biden
Lok Sabha Election Result 2024 Updates : इंडिया आघाडीचं ठरलं; सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत, पण योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याचं सूचक विधान!
Inzmam Ul Haq Accused India of Ball Tampering in IND v AUS
“भारताने बॉलसह…” पाकिस्तानच्या इंझमाम उल हकचा भारतीय संघावर मोठा आरोप, म्हणाले- “अर्शदीपला १५ व्या षटकात…”
Gulbadin Naib Faking Injury to Waste Time
AFG v BAN: ‘हळू खेळा, पाऊस येतोय’, अफगाणिस्तानच्या कोचचा इशारा आणि गुलबदीन पाय पकडून खाली पडला… पाहा VIDEO

हेही वाचा – T20 WC 2024: भारत-इंग्लंड सेमीफायनल पावसामुळे रद्द झाल्यास कोणता संघ फायनलमध्ये जाणार? वाचा उपांत्य फेरीचे नियम

ही पद्धत सुरू करण्याआधी, हवामानाचा फटका बसलेल्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये योग्य धावसंख्येचा पाठलाग कसा करायचा यावर विचार करत होते. १९९२ च्या एकदिवसीय विश्वचषकात, जेव्हा इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना सिडनीच्या मैदानावर खेळवला गेला, तेव्हा पावसामुळे तो सामना इंग्लंडच्या संघाने जिंकला, ज्यामध्ये आफ्रिकेला शेवटच्या चेंडूवर २२ धावा करण्याचे लक्ष्य ठेवावे लागले, जे निव्वळ अशक्य होते. यानंतर पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यांसाठी नवीन नियमाचा शोध सुरू झाला.

हेही वाचा – अफगाणिस्तानची प्रगती ‘याचि देही याचि डोळा’ पाहणारा मोहम्मद नबी, जागतिक क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम केला नावे

११९७ मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये DLS नियम वापरण्यात आला, त्यानंतर २००१ मध्ये ICC ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा नियम पूर्णपणे लागू करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन सांख्यिकीशास्त्रज्ञ स्टीव्हन स्ट्रेन यांनी डकवर्थ आणि लुईसच्या या नियमात किंचित सुधारणा केल्यावर २०१४ मध्ये या नियमाचे नाव देखील बदलण्यात आले. डकवर्थ आणि लुईस यांच्या निवृत्तीनंतर या पद्धतीचे नाव बदलून डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धत असे ठेवण्यात आले, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन सांख्यिकीशास्त्रज्ञ स्टीव्हन स्टर्न यांनी काही बदल केले.

हेही वाचा – AFG v BAN: ‘हळू खेळा, पाऊस येतोय’, अफगाणिस्तानच्या कोचचा इशारा आणि गुलबदीन पाय पकडून खाली पडला… पाहा VIDEO

डीएलएस ही पद्धत एका जटिल सांख्यिकीय विश्लेषणावर आधारित आहे. ज्यामध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघासाठी सुधारित लक्ष्य निश्चित करण्यासाठी उर्वरित विकेट आणि गमावलेली षटके यासारख्या अनेक घटकांचा विचार केला जातो.