द्विशतकवीर चेतेश्वर पुजाराच्या कामगिरीचे भारताचा माजी कर्णधार कपिल देवने शुक्रवारी मुक्तकंठाने कौतुक केले. भारताला राहुल द्रविडची पोकळी भरणारा फलंदाज लाभला आहे, हे म्हणणे घाईचे होईल, असेही कपिल यावेळी आवर्जून म्हणाला.‘‘पुजाराने आत्ताच आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली आहे. त्याने आपल्या गुणवत्तेचा प्रखरतेने प्रत्यय दिला आहे. पण द्रविडशी तुलना करण्याची घाई करू नये. प्रथम त्याला संघातील स्थान आणि आपले नाव निर्माण करू द्यावे,’’ असे मत कपिलने व्यक्त केले आहे. ‘‘राहुलने क्रिकेटला १५ वष्रे दिली. त्यामुळेच तो ‘द वॉल’ म्हणून ओळखला जाऊ लागला,’’ असे तो पुढे म्हणाला.    

Story img Loader