सध्या तरी महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाची तुलना करणे उचित ठरणार नाही. ‘‘बाप बाप होता है, और
बेटा बेटा होता है’’, असे वक्तव्य भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले आहे.
धोनी आणि कोहली यांच्या नेतृत्वाबाबत विचारले असता कपिल म्हणाले की, ‘‘कोहलीने आता कुठे कसोटी संघाचे नेतृत्व सांभाळले आहे. धोनीच्या यशापर्यंत पोहोचायला कोहलीला काही वेळ लागेल. कोहली हा एक दर्जेदार फलंदाज आणि तितकाच चांगला कर्णधारही.’’
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना आही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कसोटी मालिकेबद्दल कपिल म्हणाले की, ‘‘जर भारताची बलस्थाने लक्षात घेऊन खेळपट्टी बनवली तर त्याचा नक्कीच फायदा होईल. खेळपट्टी फलंदाजी आणि फिरकीला पोषक असली तरी त्याचा फायदा भारताला होईल. पण जर असे घडले नाही तर भारतासाठी ही मालिका निश्चितच सोपी नसेल.’’
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या प्रकाराबद्दल कपिल यांनी शास्त्री यांची बाजू घेतली आहे. ते म्हणाले की, ‘‘जर मालिका २-२ अशी बरोबरीत होती, तर निर्णायक सामन्यामध्ये भारताला पोषक असेल बनवायला हवे होते, पण तसे घडले नाही. जेव्हा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जातो तेव्हा त्यांना वेगवान आणि उसळी असणाऱ्या खेळपट्टीवर खेळावे लागते. त्यामुळे भारतीय कर्णधारानुसार खेळपट्टी बनवणे अयोग्य नाही.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा