आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) २०२० पासून कुस्तीला वगळण्याचा घेतलेला निर्णय अयोग्य असून या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आयओसीकडे केली आहे. तसेच आयओसीवरील भारताचे प्रतिनिधी रणधीर सिंग यांनी याबाबत आग्रह धरावा, असेही त्यांनी सुचविले आहे.
केंद्रीय क्रीडा सचिव प्रदीपकुमार देव यांनी सांगितले, ‘‘ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या २५ क्रीडा प्रकारांमधून कुस्तीला वगळण्याचा निर्णय केवळ भारत नव्हे तर अमेरिका, रशिया, मंगोलिया, उझबेकिस्तान, जपान, चीन आदी अनेक देशांच्या गुणवान खेळाडूंचे नुकसान करणारा आहे. रणधीर यांनी कुस्तीबाबत भारताची ठाम भूमिका आयओसीकडे मांडली पाहिजे अशी आमची विनंती आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाना १८९६ पासून सुरुवात झाली. तेव्हापासून प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचे सामने झाले आहेत. हा खेळ वगळल्यास खेळाडूंबरोबरच या चाहत्यांचीही निराशा होणार आहे.’’
ऑलिम्पिकमधून कुस्तीला वगळू नये
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) २०२० पासून कुस्तीला वगळण्याचा घेतलेला निर्णय अयोग्य असून या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आयओसीकडे केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-02-2013 at 06:29 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not skip wrestling from olympic