लंडन येथे होणारी चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धा ही रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी रंगीत तालीमच आहे व या स्पर्धेचा उपयोग ऑलिम्पिकसाठी संघबांधणीकरिता होईल, असे भारतीय संघाचा कर्णधार सरदार सिंगने सांगितले.
चॅम्पियन्स स्पर्धा १० जूनपासून सुरू होणार असून या स्पर्धेत भारताला विश्वविजेता ऑस्ट्रेलिया, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता जर्मनी, इंग्लंड, बेल्जियम व दक्षिण कोरिया यांच्याशी खेळावे लागणार आहे. सरदार सिंगने सांगितले, ‘‘हे संघ अतिशय तुल्यबळ असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्या दृष्टीने आम्ही सराव शिबिरात भक्कम तयारी केली आहे. अझलान शाह चषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये आम्हाला निराशाजनक कामगिरीस सामोरे जावे लागले
होते. आम्ही या सामन्यांमध्ये गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालविल्या. या चुका दुरुस्त करण्याची संधी आम्हाला चॅम्पियन्स स्पर्धेद्वारे मिळणार आहे.’’

Story img Loader