न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघाने ऑफस्पिनर डॉम बेसचा संघात समावेश केला आहे. लॉर्ड्स येथे खेळलेला पहिला कसोटी सामना बरोबरीत सुटला. आता उभय संघात दुसरा कसोटी सामना १० जूनपासून बर्मिंगहॅममध्ये खेळला जाईल. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज आणि लॉर्ड्सवर पदार्पण केलेला ओली रॉबिन्सन सध्या निलंबित आहे. जुने ट्वीट व्हायरल झाल्यामुळे रॉबिन्सनला कारवाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे बेसचा पर्यायी खेळाडू म्हणून संघाच समावेश करण्यात आला. पण आता इंग्लंडसमोर एजून एक अडचण उभी राहू शकते.
हेही वाचा – पाकिस्तान सुपर लीगपूर्वी ‘स्टार’ क्रिकेटपटू झाला रक्तबंबाळ, तोंडाला पडले ७ टाके!
रॉबिन्सनप्रमाणे डोम बेसचेही निलंबन होऊ शकते. बेसच्या इंग्लंड संघातील समावेशानंतर ट्विटरवर तो चर्चेचा विषय ठरला. याचे कारण म्हणजे बेसचे जुने आणि वादग्रस्त ट्वीट व्हायरल झाले आहे. २०१३च्या चॅम्पियन ट्रॉफीदरम्यान भारतीय संघाच्या राष्ट्रगीताबद्दल बेसच्या ट्विटर अकाऊंटवरून वादग्रस्त ट्वीट करण्यात आले होते. शिवाय त्याने महेंद्रसिंह धोनीच्या बॅट बदलण्याच्या बाबतीतही विधान केल्याचे समोर आले. या व्हायरल झालेल्या ट्वीटनंतर बेसने आपले ट्विटर अकाऊंट बंद केले आहे.
हेही वाचा – टी-१० क्रिकेटमध्ये फलंदाजाचं २८ चेंडूत शतक, प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना पळव पळव पळवलं!
क्रिकबझच्या वृत्तानुसार, न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत फिरकीपटू म्हणून जॅक लीच इंग्लंडची पहिली पसंती आहे. सिल्व्हरवूूड म्हणाले, “बेस रविवारी टीम हॉटेलमध्ये पोहोचला आणि त्याला ४८ तासांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करावा लागेल. जर योजनेनुसार सर्व नीट झाले, तर बेस बुधवारपासून संघाबरोबर प्रशिक्षण घेईल.” यापूर्वी अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध बेसने कसोटी सामना खेळला होता, त्यात त्याला विकेट मिळू शकली नव्हती.