देशातील स्थानिक क्रिकेटचा हंगाम १५ ऑक्टोबरपासून दुलीप करंडक क्रिकेट स्पध्रेने सुरू होणार आहे. याचप्रमाणे प्रतिष्ठेच्या रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेला ७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून, ती १२ मार्चपर्यंत चालणार आहे, असे निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) स्पर्धा समितीने घेतला आहे.
रणजी विजेता कर्नाटक, ४०वेळा विजेता मुंबई, बलाढय़ उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या संघांचा ‘अ’ गटात समावेश करण्यात आला आहे. दुलीप करंडक स्पर्धा १५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत तीन आठवडे चालणार आहे. ५० षटकांच्या एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय दर्जाची एकदिवसीय स्पर्धा ७ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. यापैकी विभागीय अजिंक्यपद स्पर्धा ७ ते १४ नोव्हेंबरदरम्यान होईल, तर विजय हजारे करंडक बाद फेरीची स्पर्धा १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे.
देवधर करंडक आंतरविभागीय एकदिवसीय स्पर्धा २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. राष्ट्रीय दर्जाची सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० स्पर्धा २५ ते २८ मार्च २०१५ या कालावधीत होईल, तर स्पध्रेचा अंतिम टप्पा १ ते ७ एप्रिल २०१५ या दरम्यान होणार आहे.

रणजी स्पध्रेचा कार्यक्रम
* साखळी सामने : ७ डिसेंबर २०१४ ते ८ फेब्रुवारी २०१५
* उपांत्यपूर्व फेरी : १५ ते १९ फेब्रुवारी २०१५
* उपांत्य फेरी : २५ फेब्रुवारी ते १ मार्च २०१५
* अंतिम फेरी : ८ ते १२ मार्च २०१५
रणजी करंडक स्पध्रेसाठी गटवारी
* अ-गट : कर्नाटक, बंगाल, मुंबई, रेल्वे, उत्तर प्रदेश, बडोदा, तामिळनाडू, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश.
* ब-गट : महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, सौराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, विदर्भ, हरयाणा, ओरिसा.
* क-गट : गोवा, हिमाचल प्रदेश, केरळ, हैदराबाद, आंध्र प्रदेश, आसाम, त्रिपुरा, झारखंड, सेनादल.

Story img Loader