देशातील स्थानिक क्रिकेटचा हंगाम १५ ऑक्टोबरपासून दुलीप करंडक क्रिकेट स्पध्रेने सुरू होणार आहे. याचप्रमाणे प्रतिष्ठेच्या रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेला ७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून, ती १२ मार्चपर्यंत चालणार आहे, असे निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) स्पर्धा समितीने घेतला आहे.
रणजी विजेता कर्नाटक, ४०वेळा विजेता मुंबई, बलाढय़ उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या संघांचा ‘अ’ गटात समावेश करण्यात आला आहे. दुलीप करंडक स्पर्धा १५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत तीन आठवडे चालणार आहे. ५० षटकांच्या एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय दर्जाची एकदिवसीय स्पर्धा ७ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. यापैकी विभागीय अजिंक्यपद स्पर्धा ७ ते १४ नोव्हेंबरदरम्यान होईल, तर विजय हजारे करंडक बाद फेरीची स्पर्धा १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे.
देवधर करंडक आंतरविभागीय एकदिवसीय स्पर्धा २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. राष्ट्रीय दर्जाची सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० स्पर्धा २५ ते २८ मार्च २०१५ या कालावधीत होईल, तर स्पध्रेचा अंतिम टप्पा १ ते ७ एप्रिल २०१५ या दरम्यान होणार आहे.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा ७ डिसेंबरपासून
देशातील स्थानिक क्रिकेटचा हंगाम १५ ऑक्टोबरपासून दुलीप करंडक क्रिकेट स्पध्रेने सुरू होणार आहे. याचप्रमाणे प्रतिष्ठेच्या रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेला ७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-08-2014 at 02:54 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Domestic calender to start from oct 15 ranji from dec