मोनॅको ग्रां. प्रि. शर्यतीच्या पहिल्या सराव सत्रात मर्सिडीजच्या लुइस हॅमिल्टनने सर्वात जलद वेळ नोंदवली आहे. मात्र या शर्यतीत पहिल्यांदाच सहभाग घेणाऱ्या टोरो रोसो संघाच्या १७ वर्षीय मॅक्स वेस्र्टाप्पेनने कडवी टक्कर देत दुसरे स्थान पटकावले.
विश्वविजेत्या हॅमिल्टनने यंदाच्या सत्रात पाचपैकी तीन शर्यतींमध्ये जेतेपद पटकावले आहे आणि त्याने नुकताच मर्सिडीजशी पुन्हा तीन वर्षांचा करार केला आहे.
हॅमिल्टनने १ मिनिट १८.७५० सेकंदांत टप्पा पूर्ण केला, तर मॅक्सने १ मिनिट १८.८९९ सेकंदांत प्रति टप्पा अशी वेळ नोंदवली. त्यापाठोपाठ रेड बुलच्या डॅनिएल रिकिआडरे आणि फेरारीच्या सेबॅस्टियन वेटेल यांनी अनुक्रमे तिसरे व चौथे स्थान पटकावले. टोरो रोसोच्या कार्लोस सेंजला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

Story img Loader