बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मेयप्पन यांच्यावर ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाचे आरोप लावले जात आहेत. पण पोलिसांची चौकशी पूर्ण होईपर्यंत गुरुनाथ यांच्याबाबत अंतिम निष्कर्षांपर्यंत लोकांनी पोहोचू नये, असे आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले.‘‘मुंबई आणि दिल्ली पोलिसांचे पदाधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पोलिसांनी चौकशी केल्यानंतरच या प्रकरणी बोलणे उचित ठरणार आहे. त्याआधी लोकांनी गुरुनाथबाबत कोणताही निष्कर्ष काढू नये,’’ असे शुक्ला म्हणाले.

Story img Loader