इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ अडखळत असून त्यांचा संघर्ष पाहून त्यांना पारखू नये, असे मत पाकिस्तानचे प्रशिक्षक डेव्ह व्हॅमोर यांनी व्यक्त केले आहे.भारतीय संघ इंग्लंडपुढे अडखळत असला तरी आमच्या संघाने आत्मसंतुष्ट होऊ नये, कारण इंग्लंडचा संघ हा पूर्णपणे व्यावसायिक आहे आणि त्यांची मालिकेत स्थिती भक्कम आहे, तर दुसरीकडे भारतीय संघ संघर्ष करत आहे. भारताने एखाद-दुसरी कसोटी मालिका गमावली तर त्यांचा संघ कमकुवत आहे, असे कोणीही समजू नये आणि त्यांच्या या कामगिरीच्या जोरावर त्यांच्याबद्दल मते बनवू नयेत. गेली बरीच वर्षे आपण भारतीय संघाला बघत आलेलो आहोत, त्यामुळे काही मालिकांच्या निकालांच्या जोरावर त्यांच्याबद्दल मत बनवू नये, असे व्हॅमोर यांनी सांगितले.
श्री राम सेनेची भारत-पाकिस्तान ट्वेन्टी-२० सामना उधळण्याची धमकी
बेळगाव : भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पध्र्यामध्ये बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर २५ डिसेंबरला होणारा ट्वेन्टी-२० सामना उधळण्याची धमकी श्री राम सेनेने दिली आहे. त्याचबरोबर कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला सामन्याला परवानगी नाकारण्याचे आवाहन केले आहे.

Story img Loader