Team India T20 Captain Suryakumar Yadav : भारतीय निवड समितीने गुरुवारी सूर्यकुमार यादवला नवी जबाबदारी दिली. त्याला भारतीय टी-२० संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. हार्दिकच्या फिटनेस समस्येमुळे त्याच्याऐवजी बीसीसीआयने नवा कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची निवड केली असल्याचे बोलले जात आहे. सूर्याला सर्वात लहान फॉरमॅटमध्ये संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केल्यानंतर, त्याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये नवीन ‘कर्णधार’ नेता म्हणून त्याच्या मानसिकतेबद्दल बोलताना दिसतोय.

स्टार स्पोर्ट्सने सोशल मीडियावर ही व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये सूर्यकुमारने त्याच्या कर्णधार कौशल्याबद्दल सांगितले. हा व्हिडिओ २०२३ मधला आहे, जेव्हा सूर्याने भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४-१ असा विजय मिळवून दिला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वात लहान फॉरमॅटमध्ये १-१ अशी बरोबरी साधली होती.

Credai MCHI organized 32nd Property fair at jio World Center in bkc
बीकेसीत आजपासून तीन दिवसीय मालमत्ता प्रदर्शन, एकाच ठिकाणी घरखेरदीचे पर्याय उपलब्ध होणार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
Kagiso Rabada create history first SA20 2025 Bowler to bowl 2 consecutive maiden overs in the powerplay
SA20 2025 : कगिसो रबाडाने घडवला इतिहास! अश्विन-चहलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज
devendra fadnavis likely visit davos
दावोसमध्ये पुढील आठवड्यात जागतिक आर्थिक परिषद; सात लाख कोटींचे करार अपेक्षित
PM Modi
PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान मोदी १५ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर! ‘या’ तीन युद्धनौकांचे करणार लोकार्पण
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
ncp leader ajit pawar launch connect with people initiative
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा जनता संवाद उपक्रम; आठवड्यातील तीन दिवस मंत्री पक्षाच्या मुख्यालयात

सूर्यकुमार यादव काय म्हणाला होता?

तेव्हा सूर्या म्हणाला होता की, “मी या नव्या भूमिकेचा आनंद घेत आहे. मी सर्वांसोबत वेळ घालवण्याचा आनंद घेत आहे आणि आम्ही सर्वांनी खूप फ्रँचायझी आणि देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे त्यांची ताकद आणि कमकुवतपणा समजून घेणे कठीण नाही. आम्ही मैदानाबाहेरही बराच वेळ घालवतो, त्यामुळे मैदानावर आमचा समन्वय चांगला असतो.”

हेही वाचा – Sanju Samson : कुमार संगकारा वापरतोय माझी बॅट! संजू सॅमसनची खास पोस्ट, राजस्थान रॉयल्सने शेअर केला VIDEO

या व्हिडीओlत सूर्या पुढे म्हणाला होता की, “माझ्यासाठी गोष्टी सोप्या ठेवणे महत्त्वाचे आहे. मी प्रक्रियेवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मला गोष्टी सोप्या ठेवायला आवडतात आणि मी तसा प्रयत्न करतो. त्याचबरोबर प्रत्येकाला सांगतो की गोष्टी खरोखर सोप्या ठेवण्याचा प्रयत्न करा. जास्त काही करण्याचा प्रयत्न करू नका आणि स्वतःला इतरांपेक्षा वेगळे दाखवण्याच प्रयत्न करू नका.”

हेही वाचा – IND vs SL : टीम इंडियाच्या निवडीवर शशी थरुर संतापले; म्हणाले, ‘ज्यांनी शतकं झळकावली त्यांनाच…’

झिम्बाब्वेविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेत मेन इन ब्लूचे नेतृत्व करणारा शुबमन गिल हा श्रीलंकेविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत उपकर्णधार आहे. गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषक आणि यंदाच्या टी-२० विश्वचषकात उपकर्णधार असलेला अष्टपैलू हार्दिक पंड्याला नेतृत्वाच्या भूमिकेतून मुक्त करण्यात आले आहे.भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यात विश्रांती दिल्यानंतर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत यांनाही श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० संघात बोलावण्यात आले आहे.

Story img Loader