सलामीच्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून दारुण पराभव तर दुसऱ्या सामन्यावर पावसाचे पाणी यामुळे आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सला चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर पुढील सामन्यात दबावाखाली खेळण्याची माझी इच्छा नाही आणि सामना जिंकून स्पर्धेतील आव्हान कायम राखण्याचा माझा इरादा असल्याचे संघाचा कर्णधार रोहीत शर्माने म्हटले आहे.
“या स्पर्धेत तुम्हाला सिद्ध करण्यासाठी केवळ चार सामने आहेत आणि त्यातील पहिल्या सामन्यात पराभव त्यानंतर दुसरा सामना पावसामुळे रद्द त्यामुळे पुढे काय करावे लागणार आहे. याची कल्पना आहे. तरीसुद्धा पुढील सामन्यात दबावाखाली खेळण्याची आमची इच्छा नाही. सामना जिंकणे हेच आमचे लक्ष्य असेल” असेही रोहीत शर्माने स्पष्ट केले आहे.  

Story img Loader