Akash Ambani on Rohit Sharma: आयपीएल २०२४च्या लिलावापर्यंत मुंबई इंडियन्स संघ चर्चेत होता. वास्तविक, रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याने कर्णधारपद भूषवले होते. अशा स्थितीत चाहते संतप्त होऊन नाराजी व्यक्त करत होते. हार्दिक लिलावापूर्वी गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये गेला आणि कर्णधार म्हणून त्याच्या नियुक्तीमुळे रोहितचा कर्णधार म्हणून १० वर्षांचा कार्यकाळ संपला. लिलावादरम्यान, एका चाहत्याने रोहित आणि फ्रेंचायझीच्या योजनांबद्दल विचारले, त्यावर एमआयचे मालक आकाश अंबानी याने सूचक वक्तव्य केले. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आकाश काय म्हणाला?

फ्रँचायझीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओनुसार आकाशने चाहत्याला सांगितले, “काळजी करू नका, तो फलंदाजी करेल.” दरम्यान, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतले, तर त्याचा सहकारी कर्णधार पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने दुबईतील इंडियन प्रीमियर लीग लिलावात २०.५० कोटी रुपयांना विकत घेतले. मंगळवारी झालेल्या लिलावात याची बोली लावण्यात आली.

वास्तविक, पत्रकारांशी संवाद साधताना एका व्यक्तीने थेट रोहित शर्माबद्दल प्रश्न विचारला आणि तो व्यक्ती म्हणाला, “रोहितला कर्णधार म्हणून परत आणा.” त्या व्यक्तीचा प्रश्न ऐकून आकाश अंबानीने प्रतिक्रिया दिली. मजेशीरपणे उत्तर देत सांगितले, “चिंता करू नका, संघात तो फलंदाजी करायला नक्की येईल.” या घटनेचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यावर चाहत्यांकडून अनेक कमेंट्स येत आहेत.

हेही वाचा: IPL 2024 Auction: आयपीएलमधील ऐतिहासिक बोलीनंतर मिचेल स्टार्कने केल्या व्यक्त केल्या भावना; म्हणाला, “मला स्वप्नात..”

कमिन्स आणि स्टार्कने आयपीएल मधील अनेक विक्रम मोडले

कमिन्स आणि स्टार्कने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनचा विक्रम मोडला. करनला पंजाब किंग्जने गेल्या वर्षी लिलावात १८.५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. आयपीएल २०२४च्या लिलावात १३ वेगवेगळ्या देशांतील ३३२ खेळाडूंवर बोली लावण्यात आली होती. यामध्ये भारतीयांची संख्या २१६ होती. खेळाडूंना कायम करणे, सोडणे आणि व्यापार केल्यानंतर पुन्हा घेणे. आयपीएल २०२४ लिलावात एकत्र आलेल्या १० सेटमध्ये परदेशातील खेळाडूंसाठी ३० स्लॉट्ससह जास्तीत जास्त ७७ स्लॉट रिक्त होते.

आयपीएल लिलावात काय घडले

मात्र, केवळ केकेआर (२३) आणि आरआर (२२) यांनी २५ खेळाडूंचा कोटा पूर्ण केला नाही. त्यामुळे बोली प्रक्रियेदरम्यान ७२ खेळाडूंचीच विक्री झाली. संघांनी त्यांचे ३० परदेशी खेळाडू स्लॉट पूर्ण केले. आयपीएलमध्ये २० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये पदार्पण केलेल्या स्टार्क आणि कमिन्स यांच्या व्यतिरिक्त, आयपीएल २०२४च्या लिलावात १० कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम मिळालेल्या इतर खेळाडूंमध्ये न्यूझीलंडचा अष्टपैलू डॅरिल मिचेल (सीएसके, १४.०० कोटी), भारतीय वेगवान गोलंदाज हर्षल पटेल (पीबीकेएस, रु.११.७५ कोटी), वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ (आरसीबी, रु.११.५० कोटी) आणि वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन (जीटी, रु.१० कोटी).

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont worry akash ambanis answer to the question asked about rohit sharma captivated the audience avw