टी-२० विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी पाकिस्तानी संघाचे चाहते मात्र अनोख्या पद्धतीने क्रिकेटप्रेमींची मनं जिंकत आहेत. यात पाकिस्तानच्या एका चिमुकल्या चाहत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा चिमुकला त्याच्या हटके स्टाईलमुळे फार चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर पाकिस्तान क्रिकेट संघाचे चाहते चिमुकल्याची प्रतिक्रिया बाबर आझमच्या एंट्रीशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानी संघाला यश मिळाले नसले तरी पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम याने नवे यश नक्कीच मिळवले आहे, ज्यावर चिमुकल्याची अशी गोंडस प्रतिक्रिया नक्कीच पाहण्यासारखी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तान संघाच्या चिमुकल्या चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल

मीर अबरा नावाच्या एक्स अकाउंटवरून हा क्यूट व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये तुम्हाला क्रिकेट स्टेडियममध्ये पाकिस्तान संघाचा एक छोटा फॅन दिसेल. ज्याने पाकिस्तानी क्रिकेट संघाची जर्सी परिधान केली आहे आणि तो वारंवार दोन्ही हातांच्या मुठी आवळून ‘याह…याह’ ओरडत आहे. हा चिमुकला चाहता अशाप्रकारे बहुधा आपल्या टीमला चिअर करण्याचा प्रयत्न करत होता, असे म्हटले जात आहे. या पोस्टच्या दुसऱ्या विंडोमध्ये बाबर आझम हात दाखवत असल्याचे दिसत आहे. सामन्यात काहीही घडो, पण चिमुकल्याचा हा निरागसपणा अनेकांना आवडला आहे.

दरम्यान, टी-२० विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध अमेरिका यांच्यात काल म्हणजेच गुरुवारी सामना झाला. त्या सामन्यापूर्वी पाकिस्तानी संघाला प्रोत्साहन देण्यासाठी चाहत्याने हा क्यूट व्हिडीओ पोस्ट केला असावा, ज्यावर कॅप्शन दिले होते, काळजी करू नका बाबर अजूनही तसाच आहे.

ऋषिकेशच्या गंगेच्या काठी पर्यटकांची फ्रीस्टाईल हाणामारी; एकमेकांना लाठ्या-बुक्क्यांनी मारले; VIDEO व्हायरल

मात्र, चिमुकल्या चाहत्याचे मोटिवेशन टीम पाकिस्तानसाठी फारसे कामी आले नाही. हा सामना संघाला जिंकता आला नाही. पण, पाकिस्तानच्या कर्णधाराने नवा विक्रम आपल्या नावावर करण्यात नक्कीच यश मिळविले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि हिट मॅन रोहित शर्माला मागे टाकले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont worry babar abhi wahi hain little pakistani fan reaction in stadium goes viral pak vs usa internet loves sjr