Indian Cricketers Dope Test: नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच नाडा (NADA) वेळोवेळी खेळाडूंची डोप टेस्ट घेत असते. २०१९ मध्ये, बीसीसीआय देखील NADA अंतर्गत आले. गेल्या दोन वर्षांच्या म्हणजे २०२१ आणि २०२२च्या आकडेवारीवर जर नजर टाकली तर एकूण ५९६२ खेळाडूंची डोप चाचणी करण्यात आली. त्यात फक्त ११४ क्रिकेटर्स होते, म्हणजे केवळ हे प्रमाण २ टक्के आहे. दुसरीकडे, अॅथलेटिक्स खेळाडू या बाबतीत आघाडीवर आहेत. त्यातील १७१७ खेळाडूंची डोप चाचणी घेण्यात आली. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सर्वाधिक ६ वेळा डोप चाचणीला समोरा गेला आहे. त्याचबरोबर विराट कोहलीसह अनेक दिग्गजांची एकदाही ही चाचणी केली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडियन एक्सप्रेसने आरटीआय अंतर्गत गोळा केलेल्या माहितीच्या आधारे नाडा कडून २०२१ आणि २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या डोप चाचणीची माहिती दिली आहे. अहवालानुसार, भारतीय क्रिकेटपटू डोप चाचणीच्या बाबतीत इतर देशांच्या तुलनेत खूपच मागे आहेत. वर्ल्ड डोपिंग एजन्सी म्हणजेच WADAच्या अहवालानुसार, टूर्नामेंट व्यतिरिक्त, यूके एजन्सीने २०२१ मध्ये ९६ क्रिकेटपटूंच्या चाचण्या घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाने ६९ चाचण्या घेतल्या. याबाबत वाडानेही नाडावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

हेही वाचा: Virat Kohli: “विराट हा अनेकांचे प्रेरणास्थान पण…”, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे कोहलीबाबत मोठे विधान; पाहा video

ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यांचीही चाचणी झाली आहे

रिपोर्टनुसार, रोहित शर्माने गेल्या दोन वर्षात मुंबई, अहमदाबाद, चेन्नई आणि यूएईमध्ये डोप चाचणी केली होती. याशिवाय ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि चेतेश्वर पुजारा यांच्यासह ७ खेळाडूंची एकदाच चाचणी घेण्यात आली. नाडाने बीसीसीआयच्या वार्षिक करारातील २५ पैकी १२ खेळाडूंची एकही चाचणी आतापर्यंत घेतली नाही. यामध्ये विराट कोहली, हार्दिक पांड्या, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, शार्दुल ठाकूर आणि अर्शदीप सिंग या स्टार क्रिकेटर्सचा समावेश आहे.

हेही वाचा: IND vs WI: “मी जन्मालाही आलो नव्हतो…” वेस्ट इंडिजविरुद्धच्या १००व्या कसोटीआधी रोहित असं का म्हणाला? पाहा Video

वाडाने नाडाकडून होणाऱ्या कमी चाचण्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि म्हटले आहे की, “डोपमध्ये गुंतलेल्या खेळाडूंना पकडण्यासाठी भारतीय एजन्सी योग्यरित्या काम करत नाही.” यापूर्वी अनेक भारतीय खेळाडू डोप चाचणीत नापास झाले होते. यानंतरही स्टार क्रिकेटर्सना डोप टेस्ट देण्यास सांगण्यात आले नाही. सध्या टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असल्याची माहिती आहे. त्यात ते दोन कसोटी, तीन वन डे आणि पाच टी२० सामने खेळणार आहेत. जर आपण भारतीय महिला क्रिकेट संघाबद्दल बोललो तर या काळात संघातील प्रत्येक खेळाडूची एकदा तरी डोप चाचणी झाली करण्यात आली आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांची सर्वाधिक ३-३ वेळा चाचणी झाली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dope test of only 114 cricketers in 2 years rohit sharma at the forefront many stars including kohli still away from nada avw