रिअल माद्रिदचा २-० असा विजय
चॅम्पियन्स लीग फुटबॉल
दुसऱ्या उपांत्य सामन्यात रिअल माद्रिदकडून २-० असा पराभव पत्करूनही बोरुसिया डॉर्टमंड संघाने अंतिम फेरीत स्थान पटकावले आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात डॉर्टमंडने वेम्बले संघाला ४-१ असे पराभूत केले होते. त्यामुळे एकंदरीत ४-३ असे गुण झाल्याने डॉर्टमंड संघाने अंतिम फेरीत स्थान पटकावले आहे.
रिअल माद्रिद संघाला या सामन्यात मोठय़ा विजयाची अपेक्षा होती, पण डॉर्टमंडच्या चांगल्या बचावामुळे त्यांना जास्त गोल करता आले नाहीत. पहिल्या सत्रात दोन्ही संघांकडून चांगली आक्रमणे झाली. विशेषत: माद्रिदने डॉर्टमंडच्या गोलपोस्टवर जोरदार आक्रमणे लगावली. पण दोन्ही संघांना पहिल्या सत्रात एकही गोल लगावता आला नाही.
पहिल्या सत्रात एकही गोल न लगावलेल्या माद्रिदने दुसऱ्या सत्रात संघात काही बदल केले. सामन्याच्या ५७ व्या मिनिटाला माद्रिदने ४३व्या पिवळे कार्ड मिळालेल्या हीगॉनला बाहेर काढत करिम बेनेझेमाला संधी दिली. बेनेझेमाने सुरुवातीला संयमी खेळ केला असला तरी सामन्याच्या ८३ व्या मिनिटाला पहिला गोल करीत त्याने संघाचे खाते उघडून दिले.
पहिला गोल झाल्यावर माद्रिदचा संघ अधिक आक्रमक झाला. जोरदार आक्रमण करण्याच्या नादात रामोसला पिवळे कार्ड मिळाले होते. पण त्याने ८८व्या मिनिटाला गोल करीत संघाला दुसरे यश मिळवून दिले. माद्रिदने हा सामना २-० असा जिंकला असला तरी त्यांना अपेक्षेनुरूप कामगिरी करता आली नसल्याचे त्यांचे प्रशिक्षक जोस मोरिन्हो यांनी सांगितले.
ते म्हणाले की, ‘‘पहिल्या उपांत्य सामन्यात आमच्याकडून वाईट खेळ झाला. त्यामुळे या सामन्यातून आम्हाला मोठय़ा अपेक्षा होत्या, पण या सामन्यात मोठा विजय मिळवू न शकल्याने आम्ही निराश आहोत.’’
पराभवानंतरही डॉर्टमंडची अंतिम फेरीत भरारी
रिअल माद्रिदचा २-० असा विजय चॅम्पियन्स लीग फुटबॉल दुसऱ्या उपांत्य सामन्यात रिअल माद्रिदकडून २-० असा पराभव पत्करूनही बोरुसिया डॉर्टमंड संघाने अंतिम फेरीत स्थान पटकावले आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात डॉर्टमंडने वेम्बले संघाला ४-१ असे पराभूत केले होते.
First published on: 02-05-2013 at 05:24 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dortmand in final round after defeted also