स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या दिमाखदार दोन गोलांच्या जोरावर रीअल माद्रिदने सेल्टा व्हिगो संघाला २-१ असे पराभूत करत सलग सहाव्या विजयाची नोंद केली. पहिल्या सत्रामध्ये रीअल माद्रिदने सेल्टा संघावर जोरदार हल्ले केले, पण यामध्ये त्यांना कोणतेही यश मिळाले नाही. पण तासाभरानंतर रोनाल्डोने सामन्यातीस पहिला गोल लगावत संघाचे खाते उघडले. काकाने यावेळी चेंडूवर ताबा मिळवला आणि चेंडू रोनाल्डोकडे ढकलला. याचा पुरेपूर फायदा उचलत रोनाल्डोने सामन्यातील पहिला आणि स्पर्धेतील ४२ वा गोल लगावला. माद्रिदने १-० अशी आघाडी घेतल्यावर संघात काही बदल केले, पण त्यांना दुसरा गोल काही लगावता आला नाही. सामन्याला १९ मिनिटे शिल्लक असताना पुन्हा एकाद रोनाल्डोने दुसरा गोल लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सेल्टासंघाकडून सामन्याला १० मिनिटे शिल्लक असताना इकर मुनिएइनने गोल लगावला.
संग्रहित लेख, दिनांक 12th Mar 2013 रोजी प्रकाशित
रोनाल्डोचा डबल धमाका
स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या दिमाखदार दोन गोलांच्या जोरावर रीअल माद्रिदने सेल्टा व्हिगो संघाला २-१ असे पराभूत करत सलग सहाव्या विजयाची नोंद केली. पहिल्या सत्रामध्ये रीअल माद्रिदने सेल्टा संघावर जोरदार हल्ले केले, पण यामध्ये त्यांना कोणतेही यश मिळाले नाही.

First published on: 12-03-2013 at 03:37 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Double dhamaka by ronaldo