क्रिकेटचा मास्टर ब्लाटर सचिनच्या मनात एक खंत अजूनही कायम आहे. ती म्हणजे, सचिन आपले आदर्श मानत असलेल्या विवियन रिचर्ड्स यांच्याविरोधात त्याला खेळायला मिळाले नाही.
सचिन १९८०च्या दशकात आणि १९९२च्या विश्वचषकात अनेक दिग्गज खेळाडूंविरोधात खेळला आहे. सचिन म्हणाला, “मला अजूनही आठवते आहे, की १९८७ मध्ये मैदानाबाहेर मी एक साधा ‘बॉल बॉय’ होतो. त्यानंतर पुढच्या विश्वचषकात मी संघातील एक खेळाडू झालो. हा प्रवास माझ्यासाठी नक्कीच अविस्मरणीय आहे. ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथे क्रिकेट संघांचे घेतलेले ग्रुप फोटो मला अजूनही आठवतात. या फोटोसेशन नंतर हार्बरयेथे जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यावेळी क्रिकेटमधले सर्व दिग्गज खेळाडू माझ्यासमोर होते. हा माझ्यासाठी निरंतर लक्षात राहण्यासारखा क्षण आहे.” तसेच “सर विवियन रिचर्ड्स यांच्या विरोधात खेळण्याची संधी माझ्या क्रिकेट करिअर मध्ये आली नाही याची खंत मला आहे.” असेही सचिन म्हणाला.  

Story img Loader