अंकुर स्पोर्ट्स क्लब आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत ठाण्याच्या शिवशंकरने पुरुष गटात तर मुंबईच्या डॉ. शिरोडकरने महिला गटात जेतेपदाला गवसणी घातली. मुंबईच्या अमरहिंदने ६५ किलो वजनी गटाचे जेतेपद पटकावले.
श्रमिक जिमखान्यावर झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात शिवशंकरने एचजीएसचा प्रतिकार २२-७ असा मोडून काढला. विलास जाधवने पहिल्याच चढाईत गुण मिळवून सुरेख सुरुवात केली, पण एचजीएसला खेळात सातत्य राखता आले नाही. महिला गटात, डॉ. शिरोडकरने संघर्षला २४-१५ असे सहज नमवले. शिरोडकरच्या मेघाली कोरगांवकरने एकाच चढाईत चार बळी टिपत संघर्षच्या संघर्षांतील हवाच काढून टाकली. त्यांच्या सुजाता काळगांवकर, क्षितिजा हिरवे यांनी चांगला खेळ केला. संघर्षकडून तेजश्री जोशी आणि कोमल देवकर यांनी प्रतिकार केला. ६५ किलो वजनी गटात, अमरहिंदने जय भारतचा २४-१० असा पराभव केला. अमरहिंदकडून अमित चव्हाण, अक्षय शेवडेने सुरेख चढाया केल्या. एचजीएसचा विलास जाधव (पुरुष), संघर्षची तेजश्री जोशी (महिला) आणि अमरहिंदचा अमित चव्हाण हे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचे मानकरी ठरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा