भारत-चीन यांच्यातील ताणल्या गेलेल्या संबंधामुळे बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाची स्पॉन्सरशिप Dream 11 कंपनीला दिली. पुढच्या हंगामात दोन्ही देशांमधले संबंध सुधारले नाही तर पर्याय म्हणून Dream 11 कंपनीलाच वाढीव बोलीवल २०२२ पर्यंत करार वाढवून देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता Dream 11 सोबत IPL 2020 पुरताच करार केला जाणार आहे. पुढील वर्षांच्या कराराबद्दल बीसीसीआय नंतर चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं कळतंय. तेराव्या हंगामासाठी करण्यात आलेल्या करारानुसार Dream 11 आणि बीसीसीआय यांच्यातला करार ३१ डिसेंब २०२० पर्यंत लागू असणार आहे. यासाठी Dream 11 ने बीसीसीआयला २२२ कोटी रुपये मोजले आहेत.
अवश्य वाचा – Dream 11 सोबत दोन महत्वाच्या कंपन्यांचंही IPL 2020 ला अर्थसहाय्य
तेराव्या हंगामासाठी Dream 11 बीसीसीआयला २२२ कोटी रुपये मोजणार आहे. आणि इतर दोन हंगामात VIVO ने परत येण्यासाठी नकार दिल्यास Dream 11 त्या हंगामासाठी बीसीसीआयला २३४ कोटी रुपये मोजणार होती. पण पुढील हंगामासांठी बीसीसीआयलया आणखी जास्त किंमत मिळण्याची आशा असल्यामुळे त्यांनी Dream 11 सोबतचा करार फक्त तेराव्या हंगामापुरता मर्यादीत ठेवण्याचं ठरवलंय. VIVO कंपनी आयपीएलच्या प्रत्येक हंगामासाठी बीसीसीआयला ४४० कोटी रुपये देत होती. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बीसीसीआयला यंदा स्पॉन्सरशिपच्या स्वरुपात मिळणारी रक्कम ही जवळपास अर्धी आहे.
अवश्य वाचा – IPL 2020 : स्पॉन्सरशिप शर्यतीत आघाडीवर असलेलं Tata Sons मागे का पडलं? जाणून घ्या कारण…
त्यामुळे पुढील हंगामात जगभरात आर्थिक परिस्थिती सुधारल्यास बीसीसीआयला अधिक जास्त स्पॉन्सरशिप मिळण्याची आशा आहे. त्यातच VIVO सोबतचा करार हा फक्त एका वर्षासाठी स्थगित करण्यात आल्यामुळे पुढील हंगामात VIVO कंपनीच पुन्हा आयपीएलची स्पॉन्सर म्हणून येण्याची शक्यताही नाकारण्यात येत नाहीये. आयपीएलचा तेरावा हंगाम १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये रंगणार आहे.