आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) वार्षिक बैठक २३ जूनला लंडन येथे होणार असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) हंगामी अध्यक्ष जगमोहन दालमिया भारताचे प्रतिनिधी म्हणून हजर राहणार आहेत.
द्विसदस्यीय चौकशी समिती गुरुनाथ मयप्पनची चौकशी करेपर्यंत एन. श्रीनिवासन बीसीसीआयच्या अध्यक्ष पदावरून पायउतार झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर सध्या हंगामी सूत्रे स्वीकारणारे दालमियाच आयसीसीच्या बैठकीला हजर राहणार आहेत.
सर्व कसोटी खेळणाऱ्या राष्ट्रांना पंच पुनर्आढावा प्रक्रिया (डीआरएस – डीसिझन रिव्ह्यू सिस्टिम) लागू करण्याबाबत आयसीसी आपली भूमिका या बैठकीत निश्चित करणार आहे. ‘डीआरएस’ला श्रीनिवासन यांनी विरोध केला होता. आता दालमिया याबाबत काय भूमिका घेणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार, कोणत्याही विषयाच्या अंमलबजावणीसाठी कसोटी खेळणाऱ्या राष्ट्रांपैकी १० पैकी ७ जणांची अनुकूलता आवश्यकता असते.

Story img Loader