Duleep Trophy Four teams announced : दुलीप ट्रॉफीच्या नवीन हंगामासाठी संघ जाहीर करण्यात आले आहेत. ५ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत एकूण चार संघ सहभागी होत आहेत. बीसीसीआयने सर्व संघ आणि कर्णधारांची घोषणा केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीही या स्पर्धेत खेळतील अशी अपेक्षा होती, पण त्यांची नावे कोणत्याही संघात समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. इतकेच नाही तर आणखी काही खेळाडू आहेत, जे सतत टीम इंडियासाठी खेळत आहेत, पण त्यांची नावे दुलीप ट्रॉफीसाठी निवडण्यात आलेल्या संघात नाहीत.
रोहित-विराट दुलीप ट्रॉफी खेळणार नाहीत –
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार असल्याची चर्चा होती. याचे कारण भारतीय संघाकडे सध्या एकही मालिका नाही. भारत आणि बांगलादेश यांच्यात १९ सप्टेंबरपासून पहिली कसोटी खेळली जाणार आहे, त्याआधी हे खेळाडू दुलीप ट्रॉफी खेळू शकले असते, त्यांना सामन्याचा सरावही मिळाला असता, मात्र आता संघांची घोषणा झाल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की रोहित आणि विराट कोहली दुलीप ट्रॉफी खेळणार नाही.
याशिवाय जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर आणि हार्दिक पांड्या यांचाही संघात समावेश करण्यात आलेला नाही. या खेळाडूंशिवाय टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू दुलीप ट्रॉफीमध्ये दिसणार आहेत. ज्यामध्ये ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, केएल राहुल, मोहम्मद सिराज, इशान किशन, सर्फराज खान, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिवम दुबे, तिलक वर्मा, आवेश खान, यशस्वी जैस्वाल आणि मुकेश कुमार यांचा समावेश आहे.
दुलीप ट्रॉफीचा फॉरमॅट बदलला –
यावेळी बीसीसीआयने दुलीप ट्रॉफीचा फॉरमॅट बदलला आहे. याआधी ही देशांतर्गत स्पर्धा झोनल फॉरमॅटमध्ये खेळवली जात होती, मात्र आता यामध्ये चार संघ सहभागी होणार आहेत. आता या स्पर्धेत इंडिया-ए, इंडिया-बी, इंडिया-सी आणि इंडिया-डी असे चार संघ खेळणार आहेत. या सर्व संघांची घोषणा करण्यात आली आहे.
इंडिया -ए : शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, केएल राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसीध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वत कवेरप्पा, कुमार कुशाग्रा, शास्वत रावत.
इंडिया-बी: अभिमन्यू इसवरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान, ऋषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी, एन जगदीसन.
इंडिया-सी: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल, सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीत, हृतिक शौकीन, मानव सुथार, उमरान मलिक, विशाक विजयकुमार, अंशुल कंबोज, हिमांशू चौहान, अरमान मार्कन, अरमान चौहान,संदीप वारियर.
इंडिया-डी: श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, इशान किशन, रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत, सौरभ कुमार.