Live Streaming of Duleep Trophy 2024: भारतीय क्रिकेटचा २०२४-२५ देशांतर्गत हंगाम गुरुवार, ५ सप्टेंबर रोजी प्रतिष्ठित दुलीप ट्रॉफीने सुरू होईल. चार संघांच्या या स्पर्धेत एकूण सहा सामने होणार आहेत. यामध्ये प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध एक सामना खेळणार आहे. २२ सप्टेंबर रोजी स्पर्धेचा समारोप होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यंदा देशांतर्गत खेळाडूंना दुलीप ट्रॉफीमध्ये सहभागी होणे बंधनकारक केले आहे. आता ही स्पर्धा नव्या फॉरमॅटमध्ये होणार आहे. यापूर्वी दुलीप ट्रॉफी ही विभागीय स्पर्धा असायची. आता हा सामना भारत अ, भारत ब, भारत क आणि भारत ड यांच्यात होणार आहे.
बांगलादेशविरुद्धच्या महत्त्वाच्या कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि अनुभवी अष्टपैलू रविचंद्रन अश्विन यांना विश्रांती देण्यात आली आहे. केएल राहुल, इशान किशन, शुभमन गिल, कुलदीप यादव, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंग आणि ऋषभ पंत यांसारखी अनेक मोठी नावे या मोसमात खेळताना दिसणार आहेत. आगामी आंतरराष्ट्रीय कसोटी हंगामासाठी सर्वोत्कृष्ट भारतीय संघ तयार करण्याच्या कल्पनेने ही स्पर्धा नवीन स्वरूपात खेळवली जाणार आहे.
टीम इंडियाच्या या खेळाडूंकडे नेतृत्त्व
भारत ए संघाची कमान शुबमन गिलच्या हाती असेल. त्यात केएल राहुल, मयंक अग्रवाल आणि ध्रुव जुरेल यांचाही समावेश आहे. भारत बी संघाचे नेतृत्व अनुभवी देशांतर्गत खेळाडू अभिमन्यू ईश्वरन करणार आहे. इंडिया सी चे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार आहे, तर यावर्षीचा आयपीएल विजेता कर्णधार श्रेयस अय्यर इंडिया डी चे नेतृत्व करेल. मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांना आजारपणामुळे दुलीप ट्रॉफी सामन्यातून रिलीज करण्यात आले आहे. अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाला बीसीसीआयने कोणतेही कारण न देता रिलीज केले आहे.
Duleep Trophy 2024 लाइव्ह स्ट्रीमिंग
दुलीप ट्रॉफीचा नवा हंगाम येत्या 5 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. हे सामने सकाळी ९ वाजता सुरू होतील. दुलीप ट्रॉफीचे सामने आंध्र प्रदेशातील अनंतपूर आणि बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियम येथे खेळवले जाणार आहेत. दुलीप ट्रॉफी २०२४चे भारतातील स्पोर्ट्स 18 नेटवर्क या स्पोर्ट्स चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार आहेत तर जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर हे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.
Duleep Trophy 2024: दुलीप ट्रॉफीचे पूर्ण वेळापत्रक
५-८ सप्टेंबर २०२४: भारत अ विरुद्ध भारत ब – एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
५-८ सप्टेंबर २०२४: भारत क विरुद्ध भारत ड – ग्रामीण विकास ट्रस्ट स्टेडियम, अनंतपूर
१२-१५ सप्टेंबर २०२४: भारत अ विरुद्ध इंडिया डी – ग्रामीण विकास ट्रस्ट स्टेडियम, अनंतपूर
१२-१५ सप्टेंबर २०२४: भारत ब विरुद्ध भारत क – ACA ADCA मैदान, अनंतपूर
१९-२२ सप्टेंबर २०२४: भारत अ विरुद्ध भारत क – ग्रामीण विकास ट्रस्ट स्टेडियम, अनंतपूर
१९-२२ सप्टेंबर २०२४: भारत ब विरुद्ध भारत ड – ACA ADCA मैदान, अनंतपूर.
Duleep Trophy 2024: दुलीप ट्रॉफीचे संघ
भारत-ए : शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, केएल राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसीध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वत कवेरप्पा, कुमार कुशाग्रा, शास्वत रावत.
भारत-बी : अभिमन्यू इसवरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान, ऋषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी, एन जगदीसन.
भारत-सी: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल, सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीत, हृतिक शौकीन, मानव सुथार, गौरव यादव, विशाक विजयकुमार, अंशुल कंबोज, हिमांशू चौहान, अरमान मार्कन, अरमान चौहान,संदीप वारियर.
भारत-डी: श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, इशान किशन, रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत, सौरभ कुमार.