Duleep Trophy 2024 Updates: दुलीप ट्रॉफी २०२४ चे सामने येत्या ५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यावेळी या स्पर्धेत एकूण चार संघ सहभागी होणार आहेत. चारही संघ बीसीसीआयने आधीच जाहीर केले होते. बीसीसीआयने दुलीप ट्रॉफीचा फॉरमॅट बदलला आहे. याआधी ही देशांतर्गत स्पर्धा झोनल फॉरमॅटमध्ये खेळवली जात होती, मात्र आता यामध्ये चार संघ सहभागी होणार आहेत. ज्यात भारत अ, भारत ब, भारत क आणि भारत ड असे ४ चार संघ असतील. पण आता दुलीप ट्रॉफी सुरू होण्यापूर्वीच मोठे बदल झाले आहेत. भारताचे तीन खेळाडू स्पर्धेबाहेर झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – जय शाह यांची मोठी घोषणा; BCCIकडून भारतीय क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस, बक्षीस रक्कम जाहीर

भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांना सप्टेंबरमध्ये होणाऱ्या दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीसाठी संघातून रिलीज करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने मंगळवारी (२७ ऑगस्ट) सांगितले की, सिराज आणि उमरान दोघेही आजारपणामुळे बाहेर पडले आहेत. त्यांच्या जागी वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि पुद्दुचेरीचा वेगवान गोलंदाज गौरव यादव यांचा समावेश करण्यात आला आहे.

गौरव यादवने मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्वही केले आहे. गेल्या रणजी ट्रॉफी मोसमात तो सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज होता. दरम्यान, फिरकी अष्टपैलू रवींद्र जडेजालाही रिलीज करण्यात आले आहे. सिराज टीम बी चा भाग होता. उमरान टीम सी चा भाग होता. तर जडेजा टीम बी चा भाग होता.

हेही वाचा – India Squad for Women’s T20WC: टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय महिला संघ जाहीर, श्रेयांका पाटीलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह, पाहा संपूर्ण संघ

सिराज आणि मलिकबद्दल BCCI ने काय सांगितलं?
बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सिराज आणि मलिक दोघेही आजारी आहेत आणि दुलीप ट्रॉफी सामन्यांसाठी वेळेत तंदुरुस्त होण्याची अपेक्षा नसल्याने त्यांना रिलीज केले. ही स्पर्धा ५ सप्टेंबर 2024 पासून आंध्र प्रदेशातील अनंतपूर आणि बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियम येथे सुरू होईल. इंडिया अ संघाचा कर्णधार शुभमन गिल, इंडिया ब संघाचा कर्णधार अभिमन्यू इसवरन, इंडिया क संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि इंडिया डी संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर असेल.

हेही वाचा – Sunil Gavaskar on Jay Shah: ‘जय शाह ICC चे अध्यक्ष झाले तर भारतीय क्रिकेट…” सुनील गावसकरांचे शाह यांच्या अध्यक्षपदाच्या चर्चांवर मोठे वक्तव्य

Duleep Trophy 2024: दुलीप ट्रॉफीचे पूर्ण वेळापत्रक

५-८ सप्टेंबर २०२४: भारत अ विरुद्ध भारत ब – एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
५-८ सप्टेंबर २०२४: भारत क विरुद्ध भारत ड – ग्रामीण विकास ट्रस्ट स्टेडियम, अनंतपूर

१२-१५ सप्टेंबर २०२४: भारत अ विरुद्ध इंडिया डी – ग्रामीण विकास ट्रस्ट स्टेडियम, अनंतपूर
१२-१५ सप्टेंबर २०२४: भारत ब विरुद्ध भारत क – ACA ADCA मैदान, अनंतपूर

१९-२२ सप्टेंबर २०२४: भारत अ विरुद्ध भारत क – ग्रामीण विकास ट्रस्ट स्टेडियम, अनंतपूर
१९-२२ सप्टेंबर २०२४: भारत ब विरुद्ध भारत ड – ACA ADCA मैदान, अनंतपूर.

हेही वाचा – PAK vs BAN: सामना गमावला, क्रिकेट विश्वात फजिती झाली अन् आता ICCनेही पाकिस्तानला दिला धक्का; चुकीची शिक्षा देत…

दुलीप ट्रॉफीचे संघ

भारत-ए : शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, केएल राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसीध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वत कवेरप्पा, कुमार कुशाग्रा, शास्वत रावत.

भारत-बी : अभिमन्यू इसवरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान, ऋषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी, एन जगदीसन.

भारत-सी: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल, सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीत, हृतिक शौकीन, मानव सुथार, गौरव यादव, विशाक विजयकुमार, अंशुल कंबोज, हिमांशू चौहान, अरमान मार्कन, अरमान चौहान,संदीप वारियर.

भारत-डी: श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, इशान किशन, रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत, सौरभ कुमार.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Duleep trophy 2024 mohammed siraj umran malik out due to illness and ravindra jadeja released replacement announced bdg