Duleep Trophy 2024 Manav Suthar take 7 Wickets and 7 maidens : दुलीप ट्रॉफी २०२४ मध्ये वरिष्ठ खेळाडू फ्लॉप होत असताना युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. यातील एक नाव मुशीर खान आणि दुसरे नाव २२ वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथार आहे. मानवने इंडिया डी विरुद्ध चमकदार कामगिरी करत ७ बळी घेतले. त्याचबरोबर त्याने ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील इंडिया सी संघाला इंडिया डी विरुद्ध विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. मानव सुथारने या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियासाठी आपला दावा मजबूत केला आहे. त्यामुळे हा मानव सुथार नक्की कोण आहे? जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मानव सुथारने घेतल्या आठ विकेट्स –

इंडिया सी विरुद्ध इंडिया डी सामन्यात फिरकीपटू मानव सुथार चर्चेचा विषय राहिला. त्याने शानदार गोलंदाजी करत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली इंडिया डी संघाचा पराभव करण्यात महत्वाची भूमिका बजावली. सुथारने दुसऱ्या डावात १९.१ षटके टाकली आणि ७ विकेट्स घेतल्या. या काळात त्याने ७ मेडन ओव्हर्सही टाकल्या. अशा प्रकारे त्याने शनिवारी इंडिया डी संघाला २३६ धावांवर गारद करण्यात मोलाची भूमिका बजावली. पहिल्या डावात इंडिया डी संघाने १६४ धावा आणि इंडिया सीने १६८ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये २२ वर्षीय सुथारने पहिल्या डावात एक विकेट घेतली.

मानव सुथार ठरला सामनावीर –

देवदत्त पडिक्कल (५६), रिकी भुई (४४), अक्षर पटेल (२८) आणि केएल भरत (१६) या खेळाडूंना सुथारने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याला शानदार गोलंदाजी प्रदर्शनासाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले. राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये जन्मलेल्या सुथारच्या वडिलांची इच्छा होती की त्याने फलंदाज व्हावे. तथापि, सुथारने आपल्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध काम केले, ज्यामध्ये प्रशिक्षक धीरच यांनी त्याला निर्णायक सल्ला दिला. खुद्द सुथार यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना याचा खुलासा केला. फेब्रुवारी २०२२ मध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

हेही वाचा – Duleep Trophy 2024 : ऋतुराजच्या इंडिया सी संघाने मारली बाजी, श्रेयसच्या इंडिया डीचा ४ विकेट्सनी उडवला धुव्वा

कोण आहे मानव सुथार?

मानव सुथार राजस्थानातील श्रीगंगानगर येथील क्रिकेट कोचिंग क्लबमधून आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. मानवचे वडील जगदीश सुथार यांनी त्याला अकादमीमध्ये प्रवेश मिळवून दिला आणि त्यांनी प्रशिक्षक धीरज शर्माला सांगितले की त्यांना आपल्या मुलाला स्फोटक फलंदाज बनवायचे आहे. पण घडले नेमके उलटे. धीरज शर्माने दोन दिवस मानव सुथारचा खेळ पाहिला आणि त्यानंतर त्याला समजले की मानव हा फलंदाजासाठी नाही तर गोलंदाजीसाठी बनला आहे. मानवच्या प्रशिक्षकाचा अंदाज अगदी बरोबर होता आणि आज या खेळाडूने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठे नाव कमावले आहे.

हेही वाचा – Bhuvneshwar Kumar : यूपी T20 लीगमध्ये भुवनेश्वर कुमारचा कहर! दाखवून दिले इकॉनॉमी किंग का म्हणतात?

मानव सुथार देशांतर्गत क्रिकेटमध्ये राजस्थान संघाकडून खेळतो. त्याने १४ सामन्यात २४.४४ च्या सरासरीने ६५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची ॲक्शन टीम इंडियाचा माजी फिरकीपटू सुनील जोशी सारखीच आहे. तो चेंडू सहज वळवू शकतो. मागच्या वर्षी टीम इंडिया आशिया चषकासाठी रवाना होत असताना सराव शिबिरात मानवनेही सर्वांना प्रभावित केले होते. मानवने यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाकडून पदार्पण केले होते, मात्र तेथे त्याला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Duleep trophy 2024 who is manav suthar take 7 wickets and 7 maidens overs for india c team did this against his father wish vbm