दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दक्षिण विभागाने पश्चिम विभागविरुद्ध खेळताना बाबा अपराजित आणि मनीष पांडे यांच्या दमदार खेळींच्या जोरावर ३ बाद २१३ अशी मजल मारली आहे. मंद प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आल्याने पहिल्या दिवशी ५४ षटकांचाच खेळ होऊ शकला.
दक्षिण विभागाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला असला तरी त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांना आपले तीन फलंदाज ५२ धावांमध्येच गमवावे लागले. पण त्यानंतर अपराजित आणि पांडे यांनी चौथ्या विकेटसाठी १६१ धावांची अभेद्य भागीदारी रचल्यामुळे दक्षिण विभागाला प्रकाशाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आला, तेव्हा ३ बाद २१३ अशी मजल मारता आली. अपराजितने ११ चौकारांच्या जोरावर नाबाद ९३ धावांची खेळी साकारली, तर पांडेने ७ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ८१ धावांची खेळी साकारत अपराजितला सुयोग्य साथ दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा