पीटीआय, कोईम्बतूर : मुंबईकर डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानीच्या (४/५१) दुसऱ्या डावातील प्रभावी माऱ्याच्या बळावर पश्चिम विभागाने अंतिम सामन्यात दक्षिण विभागाचा २९४ धावांनी धुव्वा उडवत दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. पश्चिम विभागाने दिलेल्या ५२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण विभागाची चौथ्या दिवसअखेर ६ बाद १५४ अशी स्थिती होती. पाचव्या दिवशी दक्षिण विभागाच्या रवी तेजाने (९७ चेंडूंत ५३) काहीशी झुंज दिली. तसेच साई किशोरने ८२ चेंडू खेळून काढताना सात धावा केल्या. या दोघांनी १५७ चेंडूंत ५७ धावांची भर घातल्यावर साई किशोरला चिंतन गाजाने बाद केले. यानंतर मुलानीने सलग दोन षटकांत तेजा आणि बासिल थम्पीला माघारी पाठवत पश्चिम विभागाला विजयासमीप नेले. अखेरीस मुंबईकर फिरकीपटू तनुष कोटियनने कृष्णप्पा गौतमला (१७) बाद करत दक्षिण विभागाचा डाव ७१.२ षटकांत २३४ धावांत संपुष्टात आणला आणि पश्चिम विभागाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा : पश्चिम विभागाला जेतेपद; दक्षिण विभागाचा २९४ धावांनी धुव्वा; मुलानीचा प्रभावी मारा
मुंबईकर डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानीच्या (४/५१) दुसऱ्या डावातील प्रभावी माऱ्याच्या बळावर पश्चिम विभागाने अंतिम सामन्यात दक्षिण विभागाचा २९४ धावांनी धुव्वा उडवत दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-09-2022 at 00:02 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Duleep trophy cricket tournament west division title won impressive ysh