तब्बल ३३ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी युवराज सिंगने केली आणि पहिल्या दिवसाच्या शतकाचा पुरेपूर फायदा उचलत त्याने सोमवारी दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत द्विशतक शतक झळकावले. त्याच्या या द्विशतकाच्या जोरावर उत्तर विभागाने पहिल्या डावात ४५१ धावा उभारल्या. दिवस अखेपर्यंत त्यांनी मध्ये विभागाच्या पाच फलंदाजांना १४६ धावांत बाद केले असून फॉलोऑन लादण्यासाठी त्यांना १०५ धावांच्या आतमध्ये मध्य विभागाच्या पाच फलंदाजांना बाद करावे लागेल.
रविवारी १३३ धावांवर नाबाद राहिलेल्या युवराजने सोमवारी आपल्या वैयक्तिक धावसंख्येत ७५ धावांची भर घालत २०८ धावा फटकावल्या. युवराजला या वेळी मधल्या आणि तळाच्या फलंदाजांचा चांगला पाठिंबा मिळाला नाही. मुरली कार्तिक आणि प्रवीण कुमार यांनी यावेळी प्रत्येकी चार बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक
उत्तर विभाग पहिला डाव : ११९.२ षटकांत सर्व बाद ४५१ (युवराज सिंग २०८, शिखर धवन १२१; प्रवीण कुमार ४/९२)
मध्य विभाग पहिला डाव : ५८ षटकांत ५ बाद १४६ (विनीत सक्सेना ३३; परविंदर अवाना २/२९).

Story img Loader