पाचही दिवस सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे अखेर दुलीप करंडकाची अंतिम लढत रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला. उत्तर आणि दक्षिण विभागाला संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात आले. पावसाची शक्यता असतानाही अंतिम लढतीचे स्थान न बदलण्याच्या धोरणाचा फटका या लढतीला बसला.
दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दहा षटकांचा खेळ झाला होता. मात्र त्यानंतर प्रत्येक दिवशी दमदार पावसामुळे खेळ रद्द करण्यात आला. पाचव्या दिवशीही सकाळीच पावसाने हजेरी लावली. पंचांनी खेळपट्टीची पाहणी केली. मात्र खेळपट्टी निसरडी असल्याने पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. संयुक्त विजेते घोषित करावे लागण्याची दुलीप करंडकातली ही चौथी वेळ आहे.