Cheteshwar Pujara and Suryakumar Yadav: चेतेश्वर पुजारा (५०*, १०३ चेंडू) आणि सूर्यकुमार यादव (५२ धावा, ५८ चेंडू) यांनी शानदार अर्धशतके झळकावल्यानंतर डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन नागवासवालाने पाच विकेट्स घेतल्या. जरी दोघांची खेळण्याची शैली एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळी असली तरी, दोघांच्या या शानदार खेळीच्या जोरावर, पश्चिम विभागाने मध्य विभागाविरुद्ध दुलीप करंडक उपांत्य फेरीच्या सामन्यात चांगली कामगिरी केली. पश्चिम विभागाने दुसऱ्या दिवशी ३ बाद १४९ धावा करून एकूण २४१ धावांची आघाडी घेतली. माहितीसाठी की, पुजारा आणि सूर्यकुमार हे दोघेही वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा भाग नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहे. भारतीय संघ सध्या कॅरेबियन भूमीवर असून सराव सुरू आहे. आता पहिला सामना सुरू व्हायला फारसा वेळ नाही. पहिला सामना १२ जुलैपासून सुरू होणार आहे. दरम्यान, यावेळी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांना संघात स्थान देण्यात आले असून चेतेश्वर पुजाराला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. संघातून वगळल्यानंतर चेतेश्वर पुजाराने दुलीप ट्रॉफीमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. पश्चिम विभागाकडून खेळायला आलेल्या चेतेश्वर पुजाराने पहिल्या डावात फलंदाजी केली नाही, मात्र दुसऱ्या डावात त्याने शानदार शतक झळकावून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्याची दमदार खेळी पाहायला मिळाली.

हेही वाचा: IND vs WI: रिंकू सिंगची निवड न करून BCCIने केली मोठी चूक? आकाश चोप्रा म्हणाला, “तिलक वर्माऐवजी लोअर ऑर्डरला…”

चेतेश्वर पुजाराने शानदार शतक झळकावले

दुलीप ट्रॉफीमध्ये चेतेश्वर पुजाराने झळकावलेले शतक खूप वेगवान आहे. २६८ चेंडूत १३२ धावांची खेळी खेळली आणि अजूनही खेळत आहे. यादरम्यान त्याने १४ चौकार आणि एक षटकार मारला. याआधी, जेव्हा तो पहिल्या डावात खेळायला आला तेव्हा त्याने १०२ चेंडू खेळले, मात्र त्याला केवळ २८ धावा करता आल्या. पहिल्या डावात पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव आणि सरफराज खान यांचा फ्लॉप शो दिसला, पण दुसऱ्या डावात काही फलंदाजांनी त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या डावात वेस्ट झोनचा संपूर्ण संघ २२० धावाच करू शकला. मात्र मध्य विभागाची कामगिरी आणखीनच खराब झाली आणि संघ १२८ धावांत गुंडाळला गेला. मात्र दुसऱ्या डावात पश्चिम विभागाने दमदार पुनरागमन करत सामन्यावरील आपली पकड मजबूत केली.

सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी खेळली

सामन्याच्या दुसऱ्या डावातही पृथ्वी शॉची खराब कामगिरी कायम राहिली. त्याला २६ चेंडूत केवळ २५ धावा करता आल्या. त्याचवेळी सूर्यकुमार यादवने ५८ चेंडूत ५२ धावांची अप्रतिम खेळी केली. जर सरफराज खानबद्दल बोलायचे झाले त्याने ३० चेंडूत फक्त सहा धावा केल्या. दरम्यान, सर्वांच्या नजरा या खेळाडूंवर लागल्या होत्या. ज्यामध्ये सूर्यकुमार यादव आणि चेतेश्वर पुजारा यांनी आपली योग्यता सिद्ध केली आहे, परंतु पृथ्वी शॉ आणि सरफराज खान यांना अद्याप स्वत:ला सिद्ध करायचे आहे.

हेही वाचा: MS Dhoni Birthday: एम.एस. धोनीच्या ४२व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांनी हैदराबादमध्ये लावले तब्बल ५२ फुटाचे कट-आउट

पुजारा पुन्हा टीम इंडियात परतणार का?

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी चेतेश्वर पुजाराची निवड झालेली नाही, मात्र यानंतरही त्याची संघात लवकर निवड होऊ शकणार नाही. कारण, या मालिकेनंतर टीम इंडिया डिसेंबरमध्ये कसोटी मालिका खेळताना दिसणार आहे, तोपर्यंत पुजारासह सूर्यकुमार यादवलाही प्रतीक्षा करावी लागेल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतील एका सामन्यात सूर्यकुमार यादवला संधी मिळाली, मात्र त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. या दोघांचा हा फॉर्म किती काळ सुरू राहतो आणि निवड समिती पुजाराच्या नावावर पुन्हा विचार करतात का, हे पाहावं लागेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Duleep trophy pujaras bat is on fire after being dropped from wi tour surya is also getting the bowlers to repent avw
Show comments