इंग्लंड दौऱ्यासंदर्भात संघ संचालक रवी शास्त्री यांच्या अहवालावर भारताचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचे भवितव्य अवलंबून आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) शास्त्री यांचा अहवाल मिळाल्यानंतर फ्लेचर यांच्याबाबतचा निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
एप्रिल २०११मध्ये झिम्बाब्वेच्या फ्लेचर यांची भारताच्या प्रशिक्षकपदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत १-३ अशा फरकाने हार पत्करल्यामुळे त्यांचे प्रशिक्षकपद संकटात सापडले आहे. त्यांचा करार पुढील विश्वचषकापर्यंत असला तरी बीसीसीआय त्यांना घरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयच्या अनौपचारिक बैठकीला हजेरी लावणाऱ्या एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शास्त्री यांच्या अहवालानंतरच फ्लेचर यांचे भवितव्य ठरवण्यात येईल. २६ सप्टेंबरला होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत तो सादर करण्यात येणार आहे.
कसोटी मालिका गमावल्यानंतर बीसीसीआयने शास्त्री यांचे संघ संचालक म्हणून नेमणूक केली. त्यानंतर पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-१ असा विजय मिळवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा