कोपा अमेरिका स्पध्रेपेक्षा रिओ ऑलिम्पिकला अव्वल आघाडीपटू नेयमार प्राधान्य देईल, असे मत ब्राझीलचे प्रशिक्षक डुंगा यांनी व्यक्त केले. कोपा अमेरिका आणि ऑलिम्पिक स्पर्धा लागोपाठ होत आहेत आणि या दोन्ही स्पध्रेत खेळण्याचे मत नेयमारने व्यक्त केले होते. त्यावर अनेक वादविवाद झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) स्पर्धा वेळापत्रकात कोपा अमेरिका स्पध्रेचा समावेश असून बार्सिलोना क्लब नेयमारला त्या काळात सूट देणे भाग आहे. दरम्यान, ऑलिम्पिक स्पध्रेसाठी नेयमारला सूट देण्यास बार्सिलोनाचा काही आक्षेप नाही. मात्र केवळ कोपा अमेरिका स्पध्रेत न खेळण्याच्या अटीवर बार्सिलोना ही सूट देण्याची शक्यता आहे.  त्यामुळे पुढील निर्णय नेयमारने घ्यायचा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dunga wants neymar at olympics rather than copa america